शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक बोहल्यावर दिग्गजांसह गावकारभारी...

By admin | Updated: February 13, 2017 22:51 IST

कऱ्हाड तालुका : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माघारीसाठी उमेदवारांची पळापळ; कुठे सून तर कुठे सासूने काढला अर्ज

कऱ्हाड : आपणही निवडणूक लढवायची अन् गावकारभारी व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या जोशानं जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी काही उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीच्या लग्नाला मोठ्या थाटामाटात उभे राहून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या ४३५ उमेदवारांपैकी आता प्रत्यक्ष निम्मेच उमेदवार रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे अर्ज काढण्यासाठी येताना ‘ना चेहऱ्यावर हसू ना डोळ्यात असू’ असे चित्र उमेदवारांच्यामध्ये दिसून आले. येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह याठिकाणी सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. हसत-खेळत पार पडलेल्या प्रक्रियेवेळी दिग्गजांसह गावकारभाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती. कोणी अर्ज काढला की लगेच त्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्याचे काम चोखपणे यावेळी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं. काहींनी तर गट व गणातील उमेदवारांचीही यादी हातामध्ये धरून ती अपडेट करण्याचं काम केलं.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात गावातील कुणी दिसले की, कशाला आला आहात? अर्ज काढायला का? कुणी अर्ज काढलाय माहिती आहे का?, असे अनेक प्रश्न जो-तो एकमेकांना विचारीत होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून ती जिंकायचीच म्हणून बारा गट व चोवीस गणांतून कऱ्हाड तालुक्यातून यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, कऱ्हाड तालुका विकास आघाडी, शिवसेना, मनसे, अपक्ष म्हणून ४३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामुळे गावागावांत अन् भागातील राजकारण चांगलेच तापले होते. सर्वांना अर्ज माघारीच्या दिवसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर तो दिवस उजाडला आणि अनेक गट व गणातील निवडणूक लढविण्याऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघार प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्यासह गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) शेवटच्या क्षणी उमेदवारांची पळापळ...आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अगदी कमी वेळ उरला असल्याने शेवटच्या क्षणी उमेदवारांची चांगलीच पळापळ झाली. काही उमेदवारांनी धावत-पळत जाऊन आपले अर्ज मागे घेतले. यावेळी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ तीन मिनिटे अवधी बाकी असताना एका उमेदवाराने आपण भरलेला अर्ज निवडणूक कक्षाकडे धावत जाऊन मागे घेतला.