शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत पुसेगावात !

By admin | Updated: January 10, 2016 00:39 IST

उद्या धावणार गाड्या : सेवागिरी यात्रेत शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण

पुसेगाव : गेल्या ६८ वर्षांपासून पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा भरविण्यात येते. मुळातच शेतकऱ्यांची यात्रा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेचे मुख्य आकर्षण बैलगाड्यांच्या शर्यती आहे. दरम्यानच्या काळात शर्यतींवर बंदी आली. ही बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत सोमवारी पुसेगावला भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी बैलगाड्यांच्या शर्यतींवर शासनाने बंदी घातली होती; परंतु श्री सेवागिरी महाराजांची यात्रा तोंडावर आली असतानाच अचानक बंदी उठली आणि त्या यात्रेत भरलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. शर्यती झाल्या आणि काही दिवसांनी पुन्हा शासनाने बंदी कायम केली. गेल्यावर्षीही शासनाची या शर्यतीवरील बंदी कायमच राहिली. शेवटपर्यंत बैलगाड्यांच्या शर्यती होतीलच या आशेवर बैलगाड्या शौकिनांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे लागल्या होत्या; मात्र पुसेगावच्या इतिहासात गतवर्षीची सेवागिरी यात्रा पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीविनाच पार पडली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पुसेगावच्या बैलगाडी आखाड्याचे भवितव्य काय? बैलगाड्या धावणार की नाही, याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, शासनाने बैलगाड्यांच्या शर्यतीला काही अटींवर परवानगी दिल्याने पुसेगावचा यावर्षी बैलगाड्यांचा शर्यंत निर्विघ्नपणे पार पाडण्याचा मार्ग खुला झाला. स्पर्धा सोमवार, दि. ११ रोजी सकाळी नऊला होणार आहेत. शर्यतींचे उद्घाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव उपस्थित राहणार आहेत. पुसेगाव-बुध रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ होणाऱ्या या शर्यंतीसाठीच्या सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबी देवस्थान ट्रस्टतर्फे पूर्ण केल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या शर्थी व नियमांचे पालन बैलगाडी मालकांनी करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर) केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायमची उठवली तर खऱ्या अर्थाने जातिवंत खिलार जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. -विजय जाधव, विश्वस्त, सेवागिरी देवस्थान