शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:47 IST

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शंभरपेक्षा जास्त जणांना तडीपार केले. त्यानंतर आता १३ टोळ्यांमधील १०२ जणांवर मोक्का कारवाई करत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवार्इंची डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहशत करून बेकायदा आर्थिक फायदा करणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे, अवैध खासगी सावकारी करणारे सराईत गुन्हेगार, मारामारी, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या १३ टोळ्यांवर सर्व पोेलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत मोक्काचे प्रस्ताव पाठवले होते. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १३ प्रस्तावातील १०२ जणांना मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

यामध्ये २०१६ मध्ये जबरीचोरी गुन्हेगारांच्या १ टोळीमधील ६, २०१७ मध्ये दरोडा टाकून दहशत माजवून मारहाण करत जबरदस्तीने वसुली करणारे ९ टोळीतील ६७ आरोपींवर व २०१८ मध्ये ३ दरोडे टाकून खून करून जबरी चोरी, सावकारीच्या व्याजासाठी दहशत करून वाहने जबरदस्तीने चोरून घेऊन जाणाºया टोळ्यांमध्ये २९ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. त्यामध्ये रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश ऊर्फ बाळू खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे, अमित ऊर्फ बिºया कदम, रुकल्या दशरथ, बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांच्या टोळीतील १०२ सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील व संदीप पाटील हे हजर झाल्यापासून जनतेतून सावकारी करणारे, खून, जबरीचोरी करणाºया लोकांवर जनतेमधून कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातून तडीपार करून शतक पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत १०२ लोकांवर मोक्का अन्वये कारवाईचे शतक पूर्ण केले. येवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील क्राईम रेट आला खालीसातारा शहरासह जिल्ह्यात बेकायदा दारू, मटका चालवणारे, खासगी सावकारी करणाºया टोळ्या व्यापारी, वाहन चालक व महिलांना १० ते २० टक्के व्याज दराने पैसे देत होते. त्यांनी धमकावणे, मारहाण व अपहरण करत दहशतीने वाहने, जमिनी व घरे स्वत:च्या अगर इतरांच्या नावे करत कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. त्यामुळे जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला होता. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपारी आणि मोक्काचे हत्यार उपसले. प्रतिबंधक कारवायांमुळे अनेकजणांना जेरबंद तर काही फरार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या आहेत.