वाठार स्टेशन : राजकीयदृष्टया जागरूक असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अंबवडे संमत वाघोलीपाठोपाठ बिचुकले गावातील आजी - माजी दीडशे पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दे धक्का देत आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. शशिकांत शिंदे यांचा पराभव करत शिवसेनेकडून महेश शिंदे आमदार झाले. त्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार महेश शिंदे गटाने वर्चस्व मिळवले. दोन वर्षांत कोरोनासारख्या परिस्थितीत राज्यात सर्वप्रथम स्वखर्चाने चार ते पाच कोरोना हॉस्पिटलची उभारणी करून अनेक लोकांना आमदार महेश शिंदे यांनी मदत केली. त्यामुळे गावोगावी आता आमदार महेश शिंदे समर्थकांची संख्या वाढू लागली आहे
अंबवडे संमत वाघोली गावातील सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन सदाशिव गिरी तसेच राष्ट्रवादीचे नेते बजरंग सकुंडे, लखन सकुंडे, दीपक सकुंडे, लखन सकुंडे, गजानन सकुंडे, लौकिक साबळे यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर चारच दिवसांत राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या बिचुकले गावातील राष्ट्रवादी, काँग्रेसचे आजी - माजी दीडशे पदाधिकारी आमदार महेश शिंदे यांच्या गटात आले.
बिचुकले गावातील काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, शिवाजी पवार, तर राष्ट्रवादीचे युवा उद्योजक अमर पवार यांच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दीपाली पवार, रेखा पवार, विश्वास अडागळे व जयश्री जाधव यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. यांच्या सोबत बिचुकले सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन विलास विनायक पवार, माजी सरपंच धनसिंग शिंदे, माजी चेअरमन किसन पवार, सोसायटी संचालक बबन पवार, प्रशांत पवार अशा दीडशे लोकांनी गावातून मिरवणूक काढत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम व बिचुकले येथील महेश शिंदे समर्थक चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला.
फोटो २६वाठार स्टेशन
आमदार शशिकांत शिंदे समर्थकांनी आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. (छाया : संजय कदम)