शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षांनंतर खंडाळा कारखान्याचे भाग्य उजळले !

By admin | Updated: March 25, 2016 23:36 IST

बॉयलर अग्निप्रदीपन : तालुक्यातील औद्योगिक विकासाची नांदी; मदन भोसले

खंडाळा : ‘खंडाळा कारखान्याचे एकविसाव्या वर्षात भाग्य उजाळले असले तरी सांघिक प्रयत्नातून या साखर कारखान्याची उभारणी होऊन झालेला पहिला बॉयलर अग्निप्रदीपन ही भविष्यातील खंडाळा तालुक्यातील कृषी औद्योगिक विकासाची नांदी आहे,’ असा विश्वास किसन वीर-खंडाळा-प्रतापगड परिवाराचे प्रमुख मदन भोसले यांनी व्यक्त केला.किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या पहिल्या बॉयलरचे अग्निप्रदीपन सीमा संजय पवार, जयश्री अनिल महांगरे, समिंद्रा शांताराम माळ, अनिता बापू माने, अनुसया जयसिंग कदम (तोंडल) या उभयतांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी किसन वीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, मिटकॉन कन्सलटंन्सीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर, सेवानिवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, आर्थिक सल्लागार एन. एस. पाटील, जिजाबा पवार, डॉ. विनय जोगळेकर, ए. बी. जाधव, एन. बी. पाटील आदी उपस्थित होते.मदन भोसले म्हणाले, ‘दोन्ही कारखान्याचे संचालक, सभासद शेतकरी, विविध कंपन्यांचे कंत्राटदार यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या खंडाळा कारखान्याचा पुढील हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना शेअर्स घ्या म्हणण्याची वेळ येणार नाही. येणारी संकटे तुडवत जाण्याचे काम आम्ही करतो. कारखान्याच्या सर्वच घटकांनी आपल्या वाटेल्या आलेल्या भूमिका कणखरपणे निभवाव्यात,’ असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी शंकरराव गाढवे, डॉ. प्रदीप बावडेकर, गजानन बाबर डॉ. विनय जोगळेकर, व्ही. जी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा लिमण, दत्तात्रय शेवते, विकास कदम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. संचालक रतनसिंह शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)