शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

... खुले में जाने से डर लगता हैं साब !

By admin | Updated: March 11, 2017 21:49 IST

फ्लेक्सवर फिल्मी डायलॉगबाजी : ‘स्वच्छ भारत मिशन’साठी कोरेगाव नगर पंचायतीचा अनोखा प्रचार

साहिल शहा --कोरेगाव ‘थप्पड से नही.. प्यार से डर लगता साब!’ दबंग चित्रपटातील या प्रसिद्ध डायलॉगमध्ये थोडा बदल करून ‘खुले में शौच जाने से डर लगता हैं साब...!’ असा फरक करून हे आणि या सारखेच अन्य काही डायलॉग सध्या कोरेगावच्या मुख्य चौकात फ्लेक्सवर झळकत आहेत. ‘स्वच्छ भारत मिशन’साठी निवडलेला हा फिल्मी जाहिरात पर्याय सध्या कोरेगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे.नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीने ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये भरीव सहभाग घेतला असून, गुडमॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर प्रातविधी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शौचालय उभारणीसाठी जनजागृती केली जात असून, त्यासाठी आझाद चौक व जुना मोटार स्टँड येथे दर्शनी भागात जुने सिनेकलाकारांच्या चित्रपटातील दृष्यांचा आधार घेऊन, त्यामध्ये रचनात्मक बदल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह नगरसेवकांना घेत मुख्याधिकारी पूनम कदम-शिंदे, कार्यालय अधीक्षक नितीन सावंत, विभाग प्रमुख विठ्ठल कुंभार, प्रकाश बर्गे, उद्धव घाडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती केली आहे. मुख्य ठिकाणांवर उघड्यावर प्रातविधी केल्यास ५०० रुपये दंड तसेच शिधापत्रिका (रेशन कार्ड) व मतदार ओळखपत्र रद्द केले जाणार असल्याचा इशारा देणारे फलक लावले आहेत. उघड्यावर प्रातविधी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तेथे देखील पद्धत अवलंबण्यात आली. ‘स्वच्छ भारत’ मिशनचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने मुख्याधिकारी कदम-शिंदे यांनी शहराचे सर्वेक्षण केले असून, त्यांनी नगरपंचायतीचे विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन गुडमॉर्निंग पथकांची स्थापना केली आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी देखील उघड्यावर प्रातविधी करणे टाळण्याबरोबरच नवीन शौचालय बांधण्यासाठी नगरपंचायतीत संपर्क साधून, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक प्रभागात जनजागृती करण्यात आली आहे, मात्र काही ठिकाणी अद्याप उघड्यावर प्रातविधी केला जात असल्याचे निदर्शनास आल्यावर गुड मॉर्निंग पथकाद्वारे दंडात्मक कारवाईस सुरुवात करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)गुड मॉर्निंग पथकाची गांधीगिरीगुड मॉर्निंग पथक दररोज सकाळी ‘आॅन दि स्पॉट’ कारवाई करत असून, गेले काही दिवस गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी देखील केली जात आहे. उघड्यावर प्रातविधी करणाऱ्यांची या पथकामुळे अक्षरश: पळापळ होत आहे. सुरुवातीला त्यांना शौचालय निर्मितीबाबत आवाहन केले जात आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला जात आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील चित्र बदलले असून, नगरपंचायतीने ही मोहीम पुढे अशीच सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केल्याने उघड्यावर प्रातविधी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काहींनी तर नगर पंचायतीत जाऊन शौचालय बांधणीच्या निधीबाबत आवश्यक माहिती गोळा करून त्या कागदांची पूर्तता करण्याचे निश्चित केले आहे. दाट वस्तीत राहणाऱ्या काहींना घराशेजारीच जागा मिळत नसल्याने अडचण होत असल्याचे चित्र दिसत आहे.फ्लेक्सवर डायलॉगबाजीशहरातील आझाद चौक आणि जुना मोटार स्टँड येथे मुख्याधिकारी कदम-शिंदे यांच्या संकल्पनेतून शोले आणि दबंग चित्रपटातील दृष्यांचा आधार घेऊन, त्यातील शब्द रचनेत बदल करून, शौचालयांचा वापर कसा अनिवार्य आहे आणि आम्ही कसे शौचालय वापरतो, याची उध्दबोधक माहिती देण्यात आलेली आहे. मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या या फलकांमुळे नागरिकांचे लक्ष याकडे जात आहे.