शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साहसी संस्थांची होणार नोंदणी

By admin | Updated: August 3, 2014 22:45 IST

उदय जोशी : साताऱ्यातील साहसवीरांना केले आवाहन

सातारा : जिल्ह्यातील साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी आता जिल्हा स्तरावर होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अध्यक्षेतखाली यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर पुणे येथील क्रीडा व युवक सेवा आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण राहणार आहे.ज्या संस्था साहसी मोहीम आयोजित करतात त्या संस्था पुरेशी वैद्यकीय साधन सामुग्री, सुरक्षिततेच्या उपाययोजना आदी बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार एका जनहित याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यानुसार राज्य शासनाला साहसी उपक्रमाबाबतचे धोरण व मार्गदर्शन सुचना करण्याचे आदेश देण्यात आले होते. परिणामी जिल्ह्यातील साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी दिली.जिल्ह्यात कार्य करणाऱ्या साहसी क्रीडा प्रकारात जमिनीवरील, हवाई व जलक्रीडा प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी विहीत नमून्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर साहसी उपक्रमासाठी मान्यता दिलेल्या संस्थांना नंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, साहसी क्रीडा प्रकारात कार्य करणाऱ्या संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)