शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यतिथीच्या खर्चार्ला फाटा देत विद्यार्थ्यांना घेतले दत्तक !

By admin | Updated: June 21, 2017 15:14 IST

हाके बंधुंचा उपक्रम : खंडाळा तालुक्यात आदर्शवत काम; समाजातून कौतुक

आॅनलाईन लोकमतखंडाळा , दि. २१ : दिवंगत पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याची प्रथा आजही समाजात रूढ आहे. पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र शिवाजीनगर, ता. खंडाळा येथील हाके बंधुंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पुण्यतिथीच्या खचार्ला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या वार्षिक खर्चाची जबाबदारी स्विकारली आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे समाजाला नवी दिशा देण्याचा त्यांनी धाडसी प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत रामचंद्र हाके यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही चिरंजीव हरळी वैष्णव पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब हाके आणि विकास सेवा सोसायटीचे संचालक लक्ष्मण हाके यांनी पारंपरिक पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग समाजातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी झाला तर ती खऱ्या अथार्ने आदरांजली ठरेल. असा विचार करून त्यांनी अहिरे, म्हावशी, पारगाव, बावडा, भादवडे व शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खचार्साठी दत्तक घेतले आहे.शाळेच्या सुरुवातीलाच त्यांना शालेय दफ्तर, वह्या, कंपास पेटी, गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या वषार्ची सुरुवात आनंददायी करुन दिली. त्यांचे हे काम इतरांना आदर्शवत ठरले आहे.