शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभारीच नसल्याने प्रशासकीय हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:04 IST

वाठार स्टेशन : निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण, या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे सुरुवातीला अनेकांनी स्वागत केले. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर ...

वाठार स्टेशन : निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण, या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे सुरुवातीला अनेकांनी स्वागत केले. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणात अनेक गावांत सरपंच पदाचा उमेदवारच नसल्याने, या गावांना किमान महिनाभर तरी कारभारी मिळणार नाही. त्यामुळे सध्या तरी गैरसोयीचाच सामना करावा लागणार आहे.

राज्यभर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वांचे लक्ष लागलेली सरपंच आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र कोरेगाव तालुक्यातील सोळशी, तडवळे (सं) वाघोली, तळीये, काळोशी या गावांत सरपंचपद आरक्षण पडलेला उमेदवारच नसल्याने या गावाला गावकारभारी निवडण्यासाठी किमान अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गावासह अजूनही अनेक गावांत अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, निवडणुकीपूर्वीच सरपंच आरक्षण योग्य होतं, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सरपंच आरक्षण ज्या कालावधीत जाहीर करण्यात आले, त्याचवेळी या गावातील सरपंच निवड कार्यक्रम होणार आहे. यावेळी संबंधित आरक्षण असलेला उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर हे पद रिक्त समजण्यात येऊन पुढील आदेश जिल्हाधिकारी देतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोरेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.

नेहमीप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणुकीपूर्वी जाहीर व्हावे. त्यामुळे किमान ते आरक्षण असलेला उमेदवार निवडून आणणे सोयीचे होईल.

- अमोल आवळे

कोरेगाव-फलटण शिवसेना क्षेत्रप्रमुख

जिल्ह्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार अनेक गावांत सरपंच पदाचा उमेदवार नसला तरीही काळजी करू नये. लवकरच अशा ग्रामपंचायत आरक्षणाबाबत नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- शेखर सिंह,

जिल्हाधिकारी, सातारा