शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

प्रशासनाचे नियोजन, लोकांचे पालन, कोरोना बाधित अन् मृतांचे कमी प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा कमी झाला आहे. डिसेंबर महिन्यात तर, नोव्हेंबरपेक्षा रुग्ण आणि मृत कमी झालेत. कोरोनाने ६८ जणांचाच मृत्यू झाला आहे. प्रशासनाचे नियोजन, लोकांकडून नियमांचे पालन यामुळेच हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यँत तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात २३१५४ कोरोना बाधित आढळले, तर १९८६६ जण बरे झाले होते. त्याचबरोबर ७४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, ऑक्टोबर महिन्यात बाधितांचे प्रमाण एकदम कमी आले. अवघे ८१८४ रुग्ण सापडले, तर ३८७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते, तर बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक झाले. १३७१३ कोरोनामुक्त झालेले. प्रथमच कोरोना मुक्तचा आकडा वाढल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला होता.

नोव्हेंबर महिना तर आणखी दिलासादायक ठरला. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४४५० बाधित निष्पन्न झाले, तर ६६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३५५२ वाढले; तर ३३१२ जण मुक्त झाले, तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे प्रमाण आणखी कमी झाले असले तरी बाधितांपेक्षा मुक्त होणाऱ्यांचे थोडे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, हे जिल्ह्याच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

कोट :

जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या कमी झाली आहे. ही बाब सुखावह आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. यापुढेही लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दी टाळावी. तरच कोरोनावर आपल्याला पूर्णपणे मात करणे शक्य होईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी