शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे पाऊल !

By admin | Updated: June 26, 2017 14:03 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांकडूनही सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद

आॅनलाईन लोकमतशिरवळ (जि. सातारा), दि. २६ : भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली.., तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परी तू.. आम्हा लेकरांची विठू माउली.. माउली .. माउली... माउली रूप तुझे..! या भक्तीपूर्ण ओव्यांप्रमाणे पंढरीच्या विठुरायाला साक्षी ठेवून आता घुमु द्या एकच नारा.. दारूमुक्त करूया महाराष्ट्र सारा..! हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दारुबंदीसाठी पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमुत्र्यांना देण्यात येणार आहे.व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्यावतीने दारूमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी व्हावी याकरिता सह्यांचे अभियान राबिवण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी व्हावी याकरिता सुमारे पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचा निश्चय व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्त्यांनी पंढरीच्या विठु माउलीच्या साक्षीने या चांगल्या उपक्रमाची सुरवात व्हावी याकरिता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाच्या दारूमुक्त महाराष्ट्र अभियानाला वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आळंदी ते लोणंद या वारीच्या टप्प्यामध्ये सुमारे ६० हजारांच्या आसपास सह्या देत या अभियानाला जोरदार पाठिंबा दर्शवला.येत्या काही काळामध्ये सुमारे ५ लाख सह्या घेऊन व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १००० गावांमधून २० तालुके तसेच दहा जिल्ह्यांची निवड व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

संस्कार सोहळ्यात दारूतून सुटका...

व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संस्कार सोहळ्यामध्ये दोन ते तीन हजार नागरिक दारूतून सुटका करून घेत असतात. या अभियानामध्ये भानुदास वैरट, दादा पाचपुते, राजेंद्र कानडे, विजय बंडगर, हनुमंत सकपाळ, जगनाथ शिंदे यांच्यासह अनेक युवक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.