शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

शांतता कमिटीच्या बैठकीत चव्हाण यांचे आवाहन

कऱ्हाड : ‘संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कऱ्हाडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड शहर पोलिसांच्या वतीने अर्बन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कऱ्हाडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कऱ्हाडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून कोट्यवधींचा निधी दिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये, असा सर्वांचाच प्रयत्न असला पाहिजे.’ आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘ज्या घटनेच्या अनुषंगाने ही शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे, त्या उंब्रजकरांचे मनोगत विचारात घेणे आवश्यक आहे.’ प्रारंभी डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘कऱ्हाडने देशाला तसेच राज्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे,’ असे सांगितले. आमदार आनंदराव पाटील, फारुख पटवेकर, विनायक पावसकर, मजहर कागदी, नितीन काशीद, आनंदराव लादे, अप्पा गायकवाड, शिल्पा वाळिंबे, मुुकुंद कुलकर्णी, हणमंतराव पवार, सागर बर्गे यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)