शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उडतारे गावाचा उत्तरप्रदेशमध्ये समावेश करावा

By admin | Updated: May 2, 2017 18:46 IST

ग्रामसभेचा ठराव : महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशचे सरकार शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 0२ : वाई तालुक्यातील उडतारे या गावाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात समावेश करावा, अशी खळबळजनक मागणी १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली.महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच स्वप्नील निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत शेती उत्पादनाला भाव नाही, पिकावर खर्च केलेले भांडवलदेखील परत मिळत नाही. अशात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वर्षभर शेतीसाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. उडतारे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिके घेतात. मात्र, पाणीटंचाईमुळे नगदी पिकाची लागवड करणे अशक्य झाले आहे. कडधान्य, गळिताची धान्ये, तृणधान्य यातील कशालाही भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यात अनेक सहकारी, सरकारी बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर आहे, म्हणून ग्रामस्थांनी १ मेच्या ग्रामसभेत तीन ठराव मंजूर केले आहेत. कुणाल सुनील बाबर यांनी ठराव मांडला. प्रवीण तानाजी पवार यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले. गेले अनेक दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी मायबाप सरकारकडे आस लावून बघत आहे; परंतु पदरी निराशाच पडत आहे. जर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास असमर्थ असेल तर शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणून घेऊन उत्तरप्रदेश राज्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. उडतारे गावाचा समावेश शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात व्हावा, या मागणीला ग्रामसभेने मंजुरी दिली. ग्रामसभेत मंजूर झालेले ठराव- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- शेती उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक हमीभाव द्यावा.- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात.