कऱ्हाड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बेताल व बेजबाबदार वक्तव्य केले आहे. हा राज्यातील जनतेचा घोर अपमान आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कऱ्हाड येथील शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली. तर दुसरीकडे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
येथील तहसीलदार कार्यालयासमोर कऱ्हाड तालुका शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर राणे यांच्यावर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार अमरदीप वाकरे यांना देण्यात आले. तहसीलदार कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, राजेंद्र माने, साजीद मुजावर, सतीश पाटील, नितीन देसाई, शरद कुंभार, संदीप पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान कऱ्हाड शहर शिवसेनेच्या वतीने एसटी स्टँड परिसरात मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. ‘चोर है चोर है नारायण राणे चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख संजय मोहिते, शहरप्रमुख शशिराज करपले, रामभाऊ खंडागळे, तात्या घाडगे, अक्षय गवळी, महेश पवार, बाळासाहेब वसगडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो २५कराड-राणे
कऱ्हाड शहर शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.