शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

जोडला ओढा; ठिबककडे ओढा !

By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST

‘दुष्काळी किवळ’चा शिक्का पुसणार : ग्रामस्थांच्या धडपडीला प्रशासनाचेही पाठबळ

जगन्नाथ कुंभार - मसूर -किवळ, ता. कऱ्हाड येथे पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेला साडेसात लाख रुपये खर्चाच्या ओढाजोड प्रकल्पात पाणलोट कार्यक्रमाचा कळसच गाठण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सुमारे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.ओढाजोड प्रकल्प लोकसहभाग, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, जलयुक्त शिवार अभियान, जैन इरिगेशन लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने साकारत आहे. ओढाजोड प्रकल्प खोडजाईवाडी साठवण तलावाच्या खालच्या बाजूस असणारा गावओढा ते लेंढोर ओढा असा ३२० मीटरचा होत असून, यामुळे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच लेंढोर ओढ्याच्या खालच्या बाजूस गावाला पाणीपुरवठा करणारी गावविहीर असल्याने गावाचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांच्यातून व शेतक-यांच्यातून समाधान दिसून येत आहे.किवळ या गावाला ‘जलयुक्त शिवार’ अभियानातून डॉ. अविनाश पोळ व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांनी सहभाग दर्शवून ओढाजोड प्रकल्प केल्यास गावचे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत येईल म्हणून सर्वांनीच याकडे मदतीचा ओघ दिला व गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून सध्या गावचे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होत आहे. खोडजाईवाडी साठवण तलावाच्या खालच्या बाजूस असणारा गावओढा या ओढ्याला साठवण तलावातून पाणी सोडल्यास तेच पाणी लेंढोर ओढ्याला जाऊन मिळणार आहे. आणि यातूनच गावाचा शेतीचा विकास साधण्यास मदत होणार आहे.मसूरच्या पूर्वेस दुष्काळग्रस्त गाव म्हणून किवळ गावाचा उल्लेख केला जात होता. परंतु या गावाने पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे डोळेझाक न करता शासनाच्या मिळेल त्या योजनेतून पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचे महत्त्वाचे काम केले. गावामध्ये ठिकठिकाणी ‘पाणी वाचवा देश वाचवा,’ अशा प्रकारचे फलक लावून लोकांनाही पाण्याची महती सांगणारे संदेश देण्यात आले आहेत. तसेच शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी प्रमाणात देता यावे म्हणून ठिबक सिंचन बसवून घ्या व चांगले उत्पन्न घ्या, अशा आशयाचे फलकही लावून जनजागृती केली आहे. आज किवळला पाण्याची कसलीही टंचाई दिसून येत नाही. हेच सर्व ग्रामस्थांनी मिळून पाणलोटसाठी केलेल्या कामाचे फलित आहे. आणि आता तर ओढाजोड प्रकल्पातून गाव एक वेगळाच पॅटर्न राबवत असल्याने शेतकरी बांधवांच्या आनंदाला उधाण आले आहे.भविष्यात डोंगरमाथ्यावरील वनाचे संरक्षण होण्यासाठी पाणी अडविण्यासाठी डीपीसीसीटी ,अर्धंनस्ट्रक्चर, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वनतळी आदीच्या माध्यमातून वनविभागाच्या सहकार्याने पाणलोट विकास अधिक सक्षम करण्याचा मानस आहे.- सुनील साळुंखे, उपसरपंच किवळगावातील शेती अधिकाधिक कशी ओलिताखाली येईल, यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने सतत प्रयत्नशील असून, यापुढेही उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार आहे.-संगीता साळुंखे, अध्यक्षा, माई चॅरिटेबल ट्रस्ट किवळ