शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
5
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
6
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
7
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
8
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
9
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
10
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
11
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
12
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
13
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
14
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
15
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
16
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
17
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
18
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
19
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
20
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो

आदर्श धामणेरचे सरपंच राज्य समितीचे अध्यक्ष

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

पुन्हा बहुमान : ग्रामस्वच्छता चळवळीला बळ

सातारा : ‘आदर्श गाव’ धामणेरला आणखी एक बहुमान मिळाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी धामणेरचे सरपंच शहाजीराव क्षीरसागर यांची निवड झाली आहे. राज्य शासनाने २००० मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्याला राज्यात उदंड प्रतिसाद मिळाला. ही चळवळ देशभर गाजली आणि बघता-बघता जागतिक स्तरावरही त्याची नोंद घेतली गेली. कोट्यवधी रुपयांची किासकामे यातून झाली. गावागावातील लोकांना श्रमदानाचे महत्त्व समजू लागले . ही चळवळ वाढावी म्हणून आॅगस्ट २००९ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता राज्यस्तरीय समितीची स्थापना केली. त्यास शासनाने मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यातील माधवराव पाटील-शेळगावकर यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. समितीच्या अध्यक्षांना शासनाची गाडी, स्वीय सहायक, दूरध्वनी सुविधा व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. शेळगावकर यांच्यानंतर हिवरे बाजारचे पोपटराव पवार, हर्षवर्धन सपकाळ, भारत पाटील, डॉ. मीनाक्षी सावंत, डॉ. निशिगंधा माळी, चंदू पाटील मारकवार, दिलीप परब, डॉ. म्हापुसकर आणि श्रीकांत मावरेकर अशा व्यक्तींनी या समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. शहाजीराव क्षीरसागर यांनी २००० पासून धामणेरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. धामणेरला या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नंतर पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेत विकासरत्न व राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तंटामवुक्ती अभियानात विशेष शांतता पुरस्कार मिळाला. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियानात विभागात प्रथम क्रमांक असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले. (प्रतिनिधी)