शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या चौकशीसाठी कार्यकर्ते ‘तरस’ले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:23 IST

फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात वृक्षतोड, जनावरांची अवैध वाहतूक डोंगराळ भागात नागपंचमीला तरसाची शिकार ग्रामस्थांच्या सहकार्याने शिकाºयांना पकडता आले असतेशासनाने चांगल्या प्रतीच्या गाड्याही अधिकाºयांना दिल्या आहेत

फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. माहिती देऊनही शिकार झाल्याने अद्यापही संबंधितांविरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच शिकार प्रकरणाची चौकशीही सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, जनतेतून होत आहे.नागपंचमीला शिकार करण्याची प्रथा पूर्वी अनेक भागात होती. काळाच्या ओघात तसेच वन्यजीवच्या संरक्षण कायद्यामुळे शिकारीचे प्रमाण कमी झाले असले तरी वनविभागाने सावध राहण्याची नितांत गरज होती. फलटण तालुक्यातही काहीजण शिकार करीत असतात. शिकाºयांना प्राणी कोणत्या भागात आहेत, याची माहिती लागलेली असते.यावर्षी नागपंचमीला शिकारीच्या शक्यतेबाबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीने अगोदरच माहिती दिली होती. त्या पद्धतीने वनाधिकाºयांनी पूर्वतयारीने सावधानता बाळगून शिकाºयांवर पाळत ठेवणे गरजेचे होते. तसेच बंदोबस्तात वाढ करणे आवश्यक होते. शासनाने चांगल्या प्रतीच्या गाड्याही अधिकाºयांना दिल्या आहेत. मात्र, वनविभाग व अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विंचुर्णी, ता. फलटणच्या डोंगराळ भागात नागपंचमीला तरसाची शिकार झाली. या तरसाचे मारून मारून हाल करण्यात आले. नंतर शिकारी पसार झाले. याबाबतची माहिती सर्वांना देऊन शिकाºयांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र, हे प्रकरण दडपण्याचाच अधिकाºयांनी प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिकारीची माहिती ग्रामस्थांना मिळाली नाही. ग्रामस्थांच्या सहकार्याने शिकाºयांना पकडता आले असते.गुपचूप शिकार करण्याचे काम...फलटण तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या आहे. त्यामुळे शिकारीही या भागात लक्ष ठेवून असतात. अनेकवेळा गुपचूप शिकार केली जाते. मात्र, त्याचा पत्ता लागत नाही. असाच प्रकार तरसाच्या शिकारीच्या बाबतीत घडला असता. आता ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाचा कारभार संशयात सापडला आहे. तालुक्यात वृक्षतोड, जनावरांची अवैध वाहतूक होते. या घटना वाढूनही वनविभाग लक्ष देत नाही. आतातरी संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

मुळातच दुर्मीळ होत असणाºया तरस या प्राण्याची शिकार होणे दुर्दैवी आहे. वनविभागाने वेळीच लक्ष दिले असते तर शिकारीचा प्रकार घडला नसता. वनविभागाचा कारभार रामभरोसे असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी.- विक्रम चोरमले,सामाजिक कार्यकर्ते