शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अनधिकृत नौकांवर होणार कारवाई

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

मत्स्य विभागाची तपासणी मोहीम : कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांचा डिझेल कोटा १ आॅगस्टपासून बंद

सिद्धेश आचरेकर -मालवण -सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील पर्ससीन हायस्पीड बोटींच्या अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिल्ह्यातही अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीनसह अन्य प्रकारच्या अवैध मासेमारीसाठी विनापरवाना नौकांचा वावर वाढला आहे. मत्स्य व्यवसाय विभागातर्फे नौकांची तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरु झाली असून या मोहिमेत ज्या नौका अनधिकृत आढळून येतील त्यांच्यावर व्हीआरसी (नोंदणी कागदपत्र) रद्दची कारवाई केली जाणार आहे. तसेच जे नौकाधारक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत, त्यांचा डिझेल कोटाही १ आॅगस्टपासून बंद होणार आहे. यामुळे विनापरवाना नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीला चाप बसणार आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिली. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत विनापरवाना नौकांवरून पर्ससिन, मिनी पर्ससिननेटधारक व पारंपरिक मच्छीमार यांच्यातही अवैधरीत्या होणाऱ्या मासेमारीमुळे सातत्याने संघर्ष घडत आहे. यावर पारंपरिक मच्छिमारांनी आंदोलने छेडत मत्स्य व्यवसाय विभागाकडे कारवाईची मागणी केली होती. मत्स्य व्यवसाय खात्याने सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयास जिल्ह्याच्या तिन्ही तालुक्यांमधील मच्छिमारांच्या नौकांची तपासणी करून अहवाल तयार करण्याचे, तसेच अवैधरीत्या वापरल्या जाणाऱ्या नौकांची व्हीआरसी रद्द करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात मासेमारी करणाऱ्या हजारो नौकांपैकी बऱ्याच विनापरवाना आहेत. या सर्व नौकांची तपासणी मोहीम फिशरीजकडून सुरू करण्यात आली आहे. मासेमारी बंद कालावधीत नौका तपासणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागास देण्यात आल्या आहेत.मच्छिमार नौकेस वेगळा परवाना असताना त्यावरून पर्ससिननेटची मासेमारी केली जात असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर परवाना, तसेच व्हीआरसी रद्दची कारवाई केली जाणार आहे. मच्छिमारांनी परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांचा डिझेल कोटा १ आॅगस्टपासून बंद केला जाणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने हाती घेतलेल्या नौका तपासणी मोहिमेत नौका सुस्थितीत आहे का? यांत्रिक नौकांना फ्लोरोसंट आॅरेंज रंग काढण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मच्छिमारांनी याची कार्यवाही केली का? नौकांचे क्रमांक, नौकामालकाचे नाव, छायाचित्र यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतली जाणार असून जिल्ह्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३६७ नौकाधारकसिंधुदुर्ग किनारपट्टीवर बिगर यांत्रिक नौका- तीन टनाखालील- ११२३, तीन टनावरील- २४४ असे मिळून एकुण १३६७ नौकाधारक आहेत.३४ मासळी उतरविण्याची केंद्रेसिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६ हजार ९३९ इतकी मच्छीमार संख्या आहे. तर मासळी उतरविण्याची केंद्रे ३४ आहेत. नौका तपासणी सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील अधिकृत माहिती प्राप्त होणार आहे. सध्या नौका तपासणीची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून १ आॅगस्टनंतर याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे.यांत्रिक मासेमारी नौकाएक सिलिंडरच्या- ३७३, दोन सिलिंडरच्या- ४८२, तीन सिलिंडरच्या- १२, चार सिलिंडरच्या- ५०, सहा सिलेंडरच्या- ४८०, आऊटबोट नौका- ६८७ ...तर कडक कारवाई करणारवरिष्ठांच्या आदेशानुसार मासेमारी बंद कालावधीत तिन्ही तालुक्यांतील किनारपट्टीवरील गावांमध्ये मच्छीमारांच्या नौकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी ही पाहणी पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे अनधिकृत नौका किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. मच्छीमार रितसर परवान्यासाठी अर्ज करतील, त्यांना परवाना उपलब्ध करून दिले जातील. १ आॅगस्टपासून हंगाम सुरू होणार आहे. विनापरवाना मासेमारी करताना मिनी पर्ससिन, पर्ससिननेटधारक किंवा अन्य मच्छीमार आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नौका तपासणी मोहिमेदरम्यान मच्छिमार बांधवांनी मत्स्य विभागाला सहकार्य करावे.- सुगंधा चव्हाण, मत्स्य व्यवसाय आयुक्त, मालवण