शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

लगडवाडीत वणवा लावल्याप्रकरणी दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:40 IST

वाई : वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई लगडवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी भरत सदाशिव महानवर व मेहुल ...

वाई : वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई लगडवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी भरत सदाशिव महानवर व मेहुल तानाजी महानवर ( रा. लगडवाडी, ता. वाई) यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. २० एप्रिल रोजी भरत महानवर व मेहुल महानवर यांनी स्वत:च्या मालकीच्या शेताच्या बांधावर आग लावली. मात्र ती आटोक्यात न आल्याने आग भडकली व राखीव वनक्षेत्रात पसरली व दहा हेक्टर राखीव वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले. आगीची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तपास केला असता आग ही भरत महानवर व मेहुल महानवर यांनीच लावल्याचे निदर्शनास आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपींना पकडण्यासाठी लगडवाडी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे वनपाल संग्राम मोरे, बोपेगाव वनरक्षक लक्ष्मण देशमुख, संजय आडे, वनमजूर लालसिंग पवार, अमोल इथापे, चालक श्रीनाथ गुळवे यांनी या कारवाईत भाग घेतला.