शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कुचराई करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई

By admin | Updated: July 10, 2014 00:28 IST

कृषी विभाग : सिमेंट बंधाऱ्यांबाबत मुंबईतील बैठकीत शशिकांत शिंदे यांचे संकेत

पुसेगाव : कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी चार कोटींचे सिमेंट बंधारे मंजूर आहेत. या कामांची तातडीने निविदा काढून बंधाऱ्याची कामे मार्गी लावावीत. कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी उपलब्ध असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाबाबात जलसंपदा (कृष्णा खोरे) तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे कृषी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. प्रभाकर घार्गे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप विधाते, कृषी संचालक सुरेश अनलंगेकर, डॉ. राजेंद्र देशमुख, जलसंधारण अप्पर सचिव कऱ्हाडकर, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंंह कदम, कोरेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील सिमेंट बंधाऱ्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र याची कामे ‘बी वन’ निविदाप्रकिया करूनच करावीत, असा आदेश शासनाने कृषी विभागाला दिला होता.या आदेशामुळेच कोरेगाव तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांनी बैठकीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर आगामी काळातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून कृषी विभागाने ‘बी वन’ची निविदा काढून बंधाऱ्यांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्री शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पाणलोट व सिमेंट बंधाऱ्यांची कामे चांगल्या दर्जाची होण्याकरिता अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे तसेच कामांमध्ये हालगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. घार्गे यांनी दिला. (वार्ताहर)