शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
3
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
4
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
5
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
6
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
7
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
10
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
11
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
12
काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
13
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
14
Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
15
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
16
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतरही सौरव गांगुलीला 'या' गोष्टीचा आनंद, म्हणाला...
17
Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
18
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
19
जमीन घोटाळ्याप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा! मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास
20
सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

साठ तळीरामांवर वाहन चालविताना कारवाई

By admin | Updated: September 29, 2014 00:49 IST

निवडणूक पार्श्वभूमी : विविध ठिकाणी तपासणी केंद्रे

सातारा : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ६० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक वाहनाची आणि चालकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. विशेषत: मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साह्याने वाहन चालकाची तपासणी करण्यात येत आहे. केवळ तीन दिवसांत साठजण वाहन चालविताना मद्यपान केल्याचे पोलिसांना सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांची संख्या पाहता अपघाताला हेच कारण कारणीभूत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळाहून चालक फरार होत असतो. त्यामुळे त्याने मद्यपान केले आहे का, हे समजत नाही. परिणामी ज्याचे नुकसान झाले आहे. त्याला न्याय मिळत नाही. खासगी वाहनचालक, ट्रक, रिक्षा, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनचालकांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. ब्रेथ अ‍ॅनालायझरमध्ये दोषी आढळलेल्या चालकांवर मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)