शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

By admin | Updated: September 14, 2016 00:46 IST

पिंपोडे बुद्रुक : दुसऱ्याच्या परवान्यावर चालायची २० वर्षांपासून दुकानदारी

वाठार स्टेशन : मूळव्याधीसारख्या गंभीर आजारावर गेल्या २० वर्षांपासून शस्त्रक्रिया करणाऱ्या पिंपोडे बुद्रुकमधील डी. व्ही. पिंपोडकर व एस. एस. मंडल या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध वाठार पोलिस ठाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. बीएएमएसची पदवी असताना हे शस्त्रक्रिया करीत होते.वाई हत्याकांडातील संतोष पोळ प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत बंगालमधील बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. त्यांनी दुसऱ्याच डॉक्टरांच्या नावे परवाने काढले असून, संबंधित बोगस डॉक्टर अघोरी कृत्य करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.याबाबतची माहिती अशी की, मूळव्याधीसारख्या आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी वाढल्याने वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एम. पी. रायबोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी पिंपोडे बुद्रुक येथील शुभम क्लिनिकमध्ये आरोग्य केंद्रातील परिचर रमाकांत माळी यांना रुग्ण म्हणून पाठविले. माळी यांची तपासणी करताना शासनाने नेमून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व नियमांचे पालन न केल्याचे निष्पन्न झाल्याने रायबोले यांनी डी. व्ही. पिंपोडकर व एस. एस. मंडल यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१ चे कलम ३३ व बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा १९४९ चे कलम ३ सह ६ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत वाठार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.शासकीय रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर गेल्या २० वर्षांपासून हा उद्योग सुरू होता. तरीही आजवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. संतोष पोळ घटनेनंतर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बोगस डॉक्टरांबाबत कोणकोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागणार. दोन्ही बोगस डॉक्टरांवर काय कारवाई होणार याविषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. (वार्ताहर)एकाच पदवीवरदोघांचा दवाखानापिंपोडे बुद्रुकमधील डी. व्ही. पिंपोडकर याच्याकडे बीएएमएसची पदवी आहे. मात्र, या पदवीचे गेल्या पाच महिन्यांपासून नूतनीकरण केलेले नाही. तसेच या पदवीधारकाला केवळ आयुर्वेदिक औषधे देण्याचा अधिकार असून, शस्त्रक्रिया करता येत नाही. तरीही तो गंभीर शस्त्रक्रिया करीत असे, तसेच अ‍ॅलोपॅथिक औषधे देत होता. पिंपोडकर याच्या पदवीच्या आधारे एस. एस. मंडल शस्त्रक्रिया करीत होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉपॅथीची पदवी आहे. मात्र, या पदव्यांसंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आली.