शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘वाडी’ नावामुळे म्हणे, ‘शुभमंगल’ अडतंय!

By admin | Updated: February 15, 2015 00:58 IST

पुरोगामी साताऱ्यावर परंपरेचा पगडा : जिल्ह्यात ३९१ वाड्या; पाटण तालुक्यात सर्वाधिक तर जावळी, खंडाळ्यात संख्या कमी

संजय पाटील ल्ल कऱ्हाड जिल्हा परिषदेकडे गावांच्या नाव बदलाचे सध्या सहा प्रस्ताव धूळखात पडलेत. संबंधित गावांची नावे बदलण्यासाठीची वेगवेगळी कारणे आहेत; पण ‘अडलेलं शुभमंगल’ हे सर्वांचेच मुख्य कारण आहे. गावाच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविण्यात अडचणी येत असल्याचं बहुतांश गावांचं म्हणणं आहे. तसेच ‘वाडी’ म्हणताच सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असेही काही ग्रामस्थ सांगतायत. वाई तालुक्यातील ‘चोराचीवाडी’ या महसुली गावाचा काही दिवसांपूर्वीच नावबदल झाला. चोराचीवाडी ‘आनंदपूर’ बनलं. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यातील ज्या-ज्या गावांनी नाव बदलाचे प्रस्ताव पाठविले त्यांच्या आशाही पल्लवित झाल्या. जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करताना संबंधित गावांनी नाव बदलाची वेगवेगळी कारणे दिली आहेत. मात्र, ज्यावेळी ‘लोकमत’ने नाव बदलामागील कारणांचा शोध घेतला, त्यावेळी ‘खासगी’तील अन्य काही कारणं समोर आली. ‘वाडी’शी सोयरिक करण्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे बहुतांश वाड्यांना नाव बदलायचंय, हे मुख्य कारण सध्या समोर येत आहे. जिल्ह्यात जावळी तालुक्यात १६, कऱ्हाड तालुक्यात ५८, खंडाळा १६, खटाव ४४, कोरेगाव ५०, माण २०, पाटण ७४, फलटण ४१, सातारा ५० व वाई तालुक्यात २२ वाड्या आहेत. या गावांच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविताना त्यांच्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘वाडी’ असल्यामुळेच मुला-मुलींना नकार दिला जातो. मुला-मुलींचे पालक आमच्याकडे नोंदणीसाठी आल्यानंतर काहीजण आवर्जून ‘वाडीतील स्थळ सुचवू नका,’ असेही म्हणतात. कऱ्हाडातील मधुरा वधू-वर सूचक केंद्राचे प्रमुख महेशकुमार कुत्ते सांगत होते, ‘वाडीतील मुले-मुलीही उच्चशिक्षित, संस्कारित आहेत. मात्र, तरीही ‘वाडी’चे कारण सांगून अनेकजण अशी स्थळं डावलतात. वाडीशी सोयरिक न करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात आहे. आम्ही कितीही समजून सांगितलं तरी मुला-मुलींचे आई-वडील वाडीत सोयरिक करण्यास तयारच होत नाहीत.’