शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुटीजवळ अपघात; पत्नी ठार, पती जखमी

By admin | Updated: June 13, 2015 23:57 IST

ट्रकची धडक : चालक पसार

सातारा : कोरेगाव-सातारा रस्त्यावरील त्रिपुटी खिंडीजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नी जागीच ठार झाली असून पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. शोभा नंदू कांबळे (वय ३८) असे ठार झालेल्या पत्नीचे नाव असून, नंदू शिवराम कांबळे (४३, रा. विकासनगर, खेड सातारा) असे जखमी पतीचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगावहून मोटारसायकलवरून (एमएच ११ एव्ही ३७८८) कांबळे दाम्पत्य साताऱ्याकडे येत होते. कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी खिंडीजवळ ते आल्यानंतर सातारा बाजूकडून सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एमएच २५ यू ४९४५) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये पत्नी शोभा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या होत्या, तर पती नंदू हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पलायन केले. बराचवेळ कांबळे दाम्पत्य घटनास्थळी पडून होते. काही वेळानंतर रुग्णवाहिकेतून दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)