शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंकडूनच अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर : पार्थ पोळके

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

साताऱ्यात अ‍ॅट्रॉसिटी कायदा बचाव परिषद

सातारा : ‘गोरगरीब मागासवर्गीय लोकांवर अन्याय होत असताना अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची भाषा खासदार उदयनराजे करत आहेत. हे निषेधार्ह असून, उलट उदयनराजेंनीच राजकीय स्वार्थासाठी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला आहे,’ असा घणाघात ‘विद्रोही’चे पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत केला.पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, काहीजण आरोपींना माझ्या ताब्यात द्या, गोळ्या घालतो, अशी भाषा करत आहेत. अशा लोकांनी जरा बोलताना विचार करावा.अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी उदयनराजे वारंवार करताहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा उदयनराजेंनी गैरवापर केला की नाही? हे त्यांनी जनतेला सांगावे. देशात नव्हे महाराष्ट्रात एकाही मागासवर्गीयावर कधीच अन्याय होणार नाही, अशी खात्री मागासवर्गीय जनतेला द्यावी. पिढ्यान्पिढ्या तुमची सेवा, चाकरी करणाऱ्या गरिबांविषयी कशाला बोलता, असा प्रश्न उपस्थित करून पार्थ पोळके पुढे म्हणाले, ‘आपला इतिहास चाळा. जलमंदिर स्वच्छ करायचं काम आम्ही करायचो आणि करत आलो आहोत. थोरले प्रतापसिंह महाराज यांच्याबाबतीत जे घडलं. त्याविषयी उदयनराजेंना राग का येत नाही.गरीब मागासवर्गीय जनतेचे सुरक्षा कवच असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची भाषा बंद करावी. या कायद्याचा गैरवापर कोणी केला, हे जाहीर करावे,’असे आवाहनही पार्थ पोळके यांनी केले. (प्रतिनिधी)साताऱ्यात अ‍ॅट्रॉसिटी कायदा बचाव परिषदअ‍ॅट्रॉसिटीचा कायदा आणखीनच बळकट करावा तसेच सर्व समाजातील स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना याच कायद्याने कारवाई करावी, या मागणीसाठी १६ आॅक्टोबर रोजी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बचाव परिषद साताऱ्यात घेणार असल्याची माहितीही यावेळी पार्थ पोळके यांनी दिली. यावेळी दादा ओव्हाळ, उमेश चव्हाण, संजय गाडे, राजेंद्र कांबळे, काका गाडे, गौतम वाघमारे, गणेश कारंडे आदी उपस्थित होते.