शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मेढा नगरपरिषदेत संख्याबळ नसतानाही भाजप ‘पॉवरफुल्ल’

By admin | Updated: June 30, 2017 13:33 IST

प्राची कदम यांची स्वीकृत नगरसेवक : निवडीने भाजपाला मिळाले बळ

आॅनलाईन लोकमतसायगाव ( जि. सातारा) , दि. ३0 : मेढा नगरपंचायतीत केवळ एकच नगरसेवक असतानाही स्विकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर प्राची कदम यांच्या अनपेक्षित निवडीने मेढा नगरपंचायतमधे भाजपा ‘पॉवर फुल्ल’ ठरली आहे. एकमेव निवडून आलेले नगरसेवक विकास देशपांडे यांच्या बळावर स्विकृत नगरसेवक पद मिळवून आपली सदस्य संख्या दोनवर पोहचवली आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी भाजपा चे नगरसेवक विकास देशपांडे, शिवसेनेचे पुरस्कृत नगरसेवक तांबे यांचे अर्ज भरले असताना दोन्ही पक्षांच्या वतीने एकत्रित निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यावेळी भाजपा चे नगरसेवक विकास देशपांडे यांना अनेक अमिषे दाखवली असताना देखील ते शिवसेनेबरोबर ठाम राहिले. तसेच उपनगराध्यक्ष पदाची संधी देखील सोडली. पण स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीवेळी शिवसेनेच्या वतीने कोणताही अर्ज दाखल केला नसल्याने भाजपा च्या वतीने नगरसेवक विकास देशपांडे यांनी पक्षाच्या आदेशानुसार डॉक्टर प्राची कदम यांचा अर्ज दाखल केला. तो अर्ज ग्राह्य धरून निवडणूक अधिकार्यांनी त्यांची स्विकृत नगरसेवक पदी निवड केली. यामध्ये मित्रपक्ष शिवसेनेला दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता. आलेल्या संधीनुसार ही निवड झाल्याने यामध्ये नियमबाह्य काहीही झालेले नाही. पन याबाबत चुकीची भूमिका मांडली जात आहे. कदम यांना राजकीय घराण्याचा वारसा असून माजी आमदार जी. जी. कदम यांच्या घराण्यातील स्नुषा आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जि. प. सदस्य दिपक पवार, अमितदादा कदम, विजयआप्पा शेलार, विकास देशपांडे, विठ्ठल देशपांडे, दत्तात्रय साळुंखे, जितेंद्र पंडित, दिपक कदम आदी मान्यवरांनी कौतुक केले.

देशपांडेंची भूमिका निर्णायक

मेढा नगरपंचयातीत विकास देशपांडे हे भाजप चे एकमेव नगरसेवक निवडून गेल्याने जावळीत भाजपचे कमळ फुललेले आहे.तर याच देशपांडे यांच्या निर्णायक भूमिकेमुळेच मेढा नगरपंचयातीत स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यात यश आल्यामुळे भाजप चे नगरपंचयातीतील संख्याबळ दोन झाल्यामुळे पक्षाला तालुक्याच्या राजकारणात चांगलीच बळकटी मिळाली आहे.