शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत जागा न मिळाल्याने बिचाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी

By admin | Updated: July 22, 2016 00:20 IST

हरळीतील प्रकार : गाडीत जागा न मिळाल्याने बसावे लागले घरी

खंडाळा : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय गुरुवारी खंडाळा तालुक्यातील हरळी येथे अनुभवास मिळाला. एसटीत जागाच न मिळाल्याने तेथील बारा विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागले. यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.हरळी हे गाव खंडाळा तालुक्याच्या ठिकाणापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी चौथीपर्यंतच शिक्षणाची सुविधा आहे. पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी हरळीतील मुला-मुलींना खंडाळ्याला जावे लागते. त्यासाठी लोणंदवरुन पाडळी-धावडवाडी मार्गे खंडाळ्याला जाणाऱ्या एसटीवर तेथील मुलं अवलंबून आहेत. गावातील मुलं शाळेला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी बसस्थानकावर उभी होती. ठरल्याप्रमाणे एसटीही आली. परंतु, एसटीत जागाच नसल्याने केवळ मुलींनाच जागा मिळाली.एसटी अगोदरच प्रवाशांनी खचाखच भरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागा मिळालीच नाही. साहजिकच एक दिवस घरी बसून काढावा लागला. मात्र, शाळा बुडल्यामुळे शिक्षक काय म्हणतील?, गृहपाठ दिला असेल का?, पालकांना काय सांगायचे या दडपणाखाली ते दिवसभर वावरत होते. वास्तविक पाहता या गावात पुन्हा दुपारपर्यंत दुसरी गाडी नसल्याने इतर प्रवाशांनीच किंवा वाहकांनी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते; पण तसे काहीच न झाल्याने शैक्षणिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना प्राधान्ययासंदर्भात पारगाव-खंडाळा आगार व्यवस्थापक मिलिंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मुलांना बसमध्ये घेतले गेले नाही, असे होणार नाही. काही वेळा प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे जागाच उपलब्ध होत नाही, तेव्हा वाहकांचाही नाईलाज होतो. विद्यार्थ्यांना प्राधान्याने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसे फलकही लावले आहेत. तरीही यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.’