शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव शास्त्रींच्या सुबुद्धीसाठी मुंडे समर्थकांचा अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:20 IST

शंभू महादेवाचे घेतले दर्शन : कार्यकर्त्यांची भगवानगडाकडे कूच

शिखर शिंगणापूर : भगवान गडावर वंजारी समाजाचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाने महंत नामदेव शास्त्री यांना सुबुद्धी द्यावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सातारा जिल्ह्यातील समर्थकांनी सोमवारी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक घातला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आसंमत दणाणून सोडला. त्यानंतर कार्यकर्ते भगवानगडाला रवाना झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सातारा जिल्ह्णातील ‘रासप’चे नेते महादेव जानकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर शंभू महादेवाच्या मंदिरातील पिंडीसमोर अनेकदा मुंडे कुटुंबीय नतमस्तक झाले आहेत.‘भगवानगड’ हा वंजारी समाज अन् मुंडे कुटुंबीयासाठी श्रद्धास्थान आहे. येथील महंत नामदेव शास्त्री व पंकजा मुंडे यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे वंजारी समाजासह इतर समाज दुखावला गेला आहे. आतातरी भगवानगडावरील महंत नामदेव शास्त्री यांना शंभू महादेवाने सुबुद्धी द्यावी, यासाठी सोमवारी शिखर शिंगणापूरला दूध, दही, साखर अन् पाणी यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी ढोल वाजवून श्री शंभू महादेवाला साकडेही घालण्यात आले,’ अशी माहिती मुंडे समर्थक डॉ. प्रसाद ओंबासे व दत्ता खाडे यांनी दिली.यावेळी दीडशे ते दोनशे भक्तांनी भगवान गडावरील वाद लवकर मिटावा व समाज पुन्हा एकदा इनामेइतबारे एकत्र यावा, अशी प्रार्थनाही केली. यावेळी प्रमोद खाडे, सतीश जानकर, दिलीप माळवे, नाथा काळेल, बाळराजे वीरकर आणि रवींद्र खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)