शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
4
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
7
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
8
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
9
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
10
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
11
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
12
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
13
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
14
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
15
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
16
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
17
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
18
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
19
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
20
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे ‘जेल भरो’

By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST

किमान वेतन : सेवानिवृत्ती वेतनही देण्याची मागणी

सातारा : कॉम्रेड चंद्रेश्वरी आयोगाच्या शिफारशी लागू करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या आणि इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी सातारा शहरात ‘जेल भरो’ आंदोलन केले. महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू व्हावे, साठ वर्षांवरील सेविकांना पेन्शन मिळावी, आंदोलनकाळातील पगार मिळावा, प्राथमिक शाळांप्रमाणे सेविका आणि मदतनीसांना एक महिन्याची उन्हाळी सुटी एकाच वेळी मिळावी, दिवाळीसाठी मानधनाएवढी भाऊबीज भेट मिळण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, मानधनाऐवजी पगाराची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, २००८ पासून सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना एकरकमी पेन्शन मंजूर व्हावी, थकित रकमा त्वरित मिळाव्यात आणि मानधन वेळेत मिळावे, या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.राज्य सरकारने रिक्त जागी काम केलेल्याचा मोबदला मासिक २००० रुपये प्रमाणे मिळावा, ग्रामीण प्रकल्पाच्या शहरी विभागातील अंगणवाडी केंद्रास किमान १००० रुपये भाडे मिळावे, सेविकांनी मानधनातून दिलेले भाडे परत करावे, अंगणवाडी तालुका प्रकल्प कार्यालयास जादा लिपिकवर्ग मंजूर व्हावा, सेविका-मदतनीसांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, चार तासांपेक्षा अधिक काम करून घेतल्यास ताशी २५ रुपयेप्रमाणे मोबदला मिळावा, टी. एच. आर. आहार बंद करावा, आहार शिजविण्याचे काम सेविका-मदतनीसांकडेच द्यावे, प्रतिलाभार्थी १० रुपये दर मिळावा, सेविका वैद्यकीय अधिकारी नसल्याने जंतनाशक गोळ््यांच्या वाटपाचे काम त्यांना देऊ नये, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.केंद्र शासनाने कामगारांच्या हिताविरोधी केलेले कायदे रद्द व्हावेत, खासगीकरण, कंत्राटीकरणास चालना मिळेल अशी कृती होऊ नये, तरुणांना स्थिर जीवन जगण्याची संधी मिळावी, दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील असा फरक रेशन कार्डात न करता ३५ किलो धान्य व १४ जीवनावश्यक वस्तू नियंत्रित दराने उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणीही सेविका-मदतनीसांनी केली. (प्रतिनिधी)अपुरे मानधन; बिलेही नाहीतगेले वर्षभर अंगणवाडी सेविकांना अपुरे मानधन मिळाले असून, पाच ते सहा महिन्यांची आहार बिलेही मिळाली नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. एक ते दीड वर्षांचा प्रवास भत्ता न मिळाल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. या रकमा तातडीने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही अंगणवाड्यांना रेशनिंग मिळत नाही. गरजेइतके धान्य अंगणवाडी केंद्रांना दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. योग्य कृती न झाल्यास दीर्घ आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.