शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अबब... साठ पोती कचरा गोळा!

By admin | Updated: June 16, 2015 01:23 IST

कास परिसराची स्वच्छता : कचराकुंड्या बसविण्याचे पालिकेचे नियोजन

सातारा : सध्या कास तलाव परिसरात पर्यटकांकडून विद्रूपीकरण होत आहे. पर्यटनासाठी येताना आपल्यासोबत आणलेल्या प्लास्टिक बाटल्या, जेवणाच्या पत्रावळ्या, पिशव्या तेथेच टाकून दिल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रविवारी पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून कास परिसरातून सुमारे ६५ पोती कचरा गोळा करण्यात आला. दरम्यान, कास परिसरात सिमेंटच्या कचराकुंड्या बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सारस यांनी दिली. पर्यटक कास परिसरात वृक्षांची कत्तल करून पार्ट्या करत आहेत, कासचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसराची निगराणी करण्यात यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याचा गांभीर्याने विचार करून पालिकेने कास परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. नगराध्यक्ष सचिन सारस, अतिरिक्त मुख्याधिकारी आशिष लोकरे, अभियंता प्रभुणे, चव्हाण, मुख्याधिकाऱ्यांचे सचिव साखरे तसेच अनिल भोसले, विश्वास गोसावी, संदीप कांबळे, दुर्वास कांबळे या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कास तलाव परिसरातील झाडाझुडपांत पर्यटकांनी केलेला कचरा अधिकाऱ्यांनी गोळा केला. यामध्ये मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, द्रोण, पत्रावळ्या, प्लासिक पिशव्या, ग्लास व इतर कचऱ्याचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी कास परिसरातून सुमारे साठ ते पासष्ठ पोती कचरा गोळा करून टेम्पोतून नेवून तो सोनगाव कचराडेपोत टाकण्यात आला. (प्रतिनिधी)