शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दहशतवादी असल्याचा मुंबई नियंत्रण कक्षाला फोन

By दत्ता यादव | Updated: February 10, 2024 21:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला साताऱ्यात दहशतवादी असल्याचा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. या प्रकरणानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी घेतल्यानंतर संशयिताची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे समोर आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला साताऱ्यात काही दहशतवादी असून, त्यांच्याकडे रडार आहे, असा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. रडार असल्याच्या माहितीमुळे सर्वच पोलिस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. पोलिसांनी तातडीने मुंबई गुन्हे शाखा तसेच सातारा पोलिस व रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती देऊन अलर्ट केले.

त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविण्यात आली. त्यास मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताची चौकशी करून त्याच्या नातेवाइकांशीही पोलिसांनी संपर्क साधला. सात वर्षांपूर्वी संशयित व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून, तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे संशयित व्यक्तीच्या जावयाने पोलिसांना सांगितले. संशयित व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे वास्तव्याला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आली. 

टॅग्स :terroristदहशतवादी