शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात ९३, जावळीत ७३ टक्के मतदान

By admin | Updated: June 14, 2015 23:55 IST

खरेदी-विक्री संघ निवडणूक : आज मतमोजणी; कडक पोलीस बंदोबस्तात मतदान

कोरेगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत ९३.४६ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदानासाठी सभासदांनी गर्दी केली होती. तर जावळी खरेदी-विक्री संघासाठी ७३ टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवार, दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव बाजार समिती आवारातील केडर सभागृहात तर कुडाळ येथष मतमोजणी केली जाणार आहे. संघाच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानासाठी सभासदांनी गर्दी केली होती. दोन्ही पॅनेलचे पदाधिकारी मतदान केंद्राजवळ तळ ठोकून होते. संघाचे दोन हजार ४६३ सभासद मतदानासाठी पात्र होते. सोनके येथे ४४८ पैकी ४४०, सातारारोड येथे ४२० पैकी ३८०, कोरेगाव येथे ५२७ पैकी ४८७, कुमठे येथे ३८२ पैकी ३५४, रहिमतपूर येथे ४५१ पैकी ४२२ तर वाठार किरोली येथे २३५ पैकी २१९ सभासदांनी मतदान केले. एकूण दोन हजार ३०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचे प्रमाण ९३.४६ टक्के एवढे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे व एस. व्ही. निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)