फलटण : जिल्हा आराेग्य विभागाकडून दि. ११ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात कोरोनाचे नवे ९३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये फलटण शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ८१ रुग्णांचा समावेश आहे.
फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक जाधववाडी येथे १३, तर तरडगाव येथे ७ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ९३ बाधितांमध्ये ४२ नागरिकांची आरटीपीसीआर तर ५१ नागरिकांची रॅट चाचणी करण्यात आली. ग्रामीण भागाातल ८१ रुग्णांमध्ये जाधववाडी १३, तरडगाव ७, गोखळी ५, ढवळ ४, खुंटे १, कोळकी ३, निरगुडी ३, मठाचीवाडी २, हिंगणगाव २, फरांडवादी १, सरडे २, साखरवाडी १, सोमंथळी २, सोनगाव १, सोनवडी १, दुधेबावी २, वडले १, तरडफ १, आसू १, आदर्की २, गुणवरे २, बरड १, काळज १, कुरवली बुद्रुक १, मुंजवडी १, फडतरवाडी १, रावडी बुद्रुक २, राजाळे १, राजुरी ३, वाखरी २, वडगाव १, तडवळे २, नांदल १, आंदरुड ४, आरडगाव १ व कर्जत येथील एका बााधिताचा समावेश आहे.
लोगो : कोरोना