शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

८४ पैशांसाठी ज्येष्ठ सातारकर ठोठावतोय दरवाजा!--लोकमत विशेष

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

ग्राहक राजा : ‘बीएसएनएल’ बिलातील गोंधळावरून वरिष्ठांकडे दाद

जगदीश कोष्टी-सातारा -ग्राहकांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना जागे करण्यासाठी शासन विविध पातळीवर जनजागृती करत असते. मात्र, शासनाकडूनच आपली फसवणूक होत आहे, असे वाटते तेव्हा करायचं काय? हा प्रश्न पडतो; पण सातारा येथील एका स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिकाने अवघ्या ८४ पैशांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे, यासाठी वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे.सुटे पैसे नाहीत म्हणून काही पैशांपासून दहा-वीस रुपयेही ‘जाऊ द्या’ म्हणणारे विक्रेते अन् ‘उदार’वादी होऊन सोडून देणारेही अनेकजण असतात. हॉटेलमध्ये जेवण केल्यावर सुटे दोन रुपये पाच रुपये टीप म्हणून देणे वेगळे अन् दहा-दहा रुपये सोडून देणे वेगळे. सुटे पैसे असले तरी विक्रेता किंवा शासकीय कर्मचारी सुटे नाहीत म्हटल्यावर उरलेले पैसे मागण्याचे धाडस दाखवत नाही. कुठं वाद घालायचा, हा विचार करून पैसे सोडून देतो; पण ही वृत्ती समाजासाठी घातक आहे.विसावा नाका परिसरात किरण कैलास नवगणे हे ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांचे पती एका खासगी कंपनीत निर्माता विभागातव्यवस्थापकपदी कार्यरत होते. त्यांना दूरध्वनी बिले व्यवस्थित येत होती; पण मे महिन्यात बिलात गोंधळ झाल्याचे लक्षात आले.नवगणे यांना एका बिलात ८२२.१६ रुपये बिल दाखविले होते. प्रत्यक्षात मात्र ८२३ रुपये आकारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बिलात ७५७.२४ रुपये असताना ७५८ रुपये आकारून ते वसूलही करण्यात आले होते. यामुळे दोन रुपये जादा आकारणी करण्यात आली आहे, असा आरोप नवगणे यांचा आहे.यासंदर्भात किरण नवगणे यांनी ‘बीएसएनएल’च्या लेखाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, व्यवहार नियमांनुसार बिलांची रक्कम पूर्णांकात घेतली जाते. यामध्ये पन्नास पैशांहून कमी रक्कम असेल तर पुढील बिलात वसूल करावी. तसेच पन्नास पैशांहून अधिक रक्कम असेल तर एक रुपया आकारण्यात यावा. मात्र, दोन्ही बिलात पन्नास पैशांपेक्षा कमी रक्कम असताना एक-एक रुपया वसूल केला आहे. हे अन्यायकारक आहे. या संदर्भात मी सातारा येथील कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे असे सांगत आहेत.काही पैशांची रक्कम असली तरी तो व्यवहार आहे. यामुळे मी सातारा कार्यालयात २५ मे रोजी तक्रार केली आहे. या घटनेला एक महिना झाला तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- कैलास नवागणे