शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’ सोसायटीत ८० लाखांचा अपहार

By admin | Updated: July 6, 2015 00:33 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक : अध्यक्ष, संचालकांविरुद्ध शिरवळमध्ये गुन्हा दाखल

शिरवळ : सुमारे ८० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ८० ते ८५ नागरिकांची सुमारे ८० ते ८५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या शिरवळ शाखेचे उद््घाटन मोठा गाजावाजा करत येथील जुना मोटार स्टँडजवळ करण्यात आले. शिरवळ येथील श्रीकांत बाळासाहेब कारळे यांची शाखा व्यवस्थापकपदी नेमणूक करण्यात आली. सोसायटीने अल्पावधीतच अनेक योजना व आमिषे दाखवून ठेवीदारांना आकर्षित करीत बस्तान बसविले. शिरवळ येथील निवृत्त शिक्षक राजाराम शंकर राऊत यांनी मुदत ठेवीवर लाख रुपये गुंतविले. नंतर आपल्या पत्नी व मुलीच्या नावानेही मोठी रक्कम गुंतविली. सोसायटीच्या आमिषाला बळी पडत अन्य दोघांनी सोसायटीमध्ये रक्कम गुंतविली. मुदत संपल्यानंतर राजाराम राऊत सोसायटीच्या शाखेत गेले असता शाखा बंद असल्याचे निदर्शनास आले. राऊत यांनी शाखा व्यवस्थापक श्रीकांत कारळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जळगाव येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगितले. ‘हे काम तुमचे आहे,’ असे राऊत यांनी सांगितले असता श्रीकांत कारळे यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. रक्कम परत मिळण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर राऊत यांच्यासह अन्य ठेवीदारांनी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात धाव घेतली. राजाराम राऊत व अन्य ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुदत ठेव व अन्य स्वरूपात ठेवलेल्या रकमेची मुदतपूर्ती होऊनही रक्कम परत न करता ठेवीदारांची फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी, उपाध्यक्ष दिलीप कांतिलाल चोरडिया यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शिरवळ येथील आणखीही अनेक नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून, फसवणूक झालेल्यांनी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात संपर्क साधावा, असे आवाहन केलेआहे़ (प्रतिनिधी)उंब्रजमध्ये ‘प्रवेश घोटाळा’‘दिल्ली येथील एम्स मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमडी’च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो,’ असे सांगून उंब्रज येथील व्यापाऱ्याची ३१ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. /वृत्त २