शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आठ गावचे शहरीकरण भाजपच्या पथ्यावर!--

By admin | Updated: May 31, 2016 00:38 IST

नगरपंचायत उलथापालथ--मोर्चेबांधणी जिल्ह्यात नवीन पाच नगरपंचायती, सुशिक्षित शहरी मतदार भाजपच्या डोळ्यासमोर! काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड आजही ग्रामीण भागात..जिल्हा परिषदेच्याही राजकारणावर परिणाम

सागर गुजर ल्ल साताराकेंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाकडे शहरी मतदारांचा ओढा आहे, हे मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले होते. हाच धागा पकडून राष्ट्रवादी व काँगे्रसच्या साम्राज्यात घुसण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणांना नगरपंचायतींचा दर्जा देऊन भाजपने नवी रणनीती हाती घेतली आहे. मलकापूर, कोरेगाव व लोणंदनंतर आता सातारा जिल्ह्यातील पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या तालुक्यांच्या ठिकाणच्या गावांना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घोषणा केल्यानंतर ‘लोकमत’ने मार्च महिन्यात हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. यानंतर नगरपंचायतीच्या निर्मितीला गती मिळाली होती. जिल्ह्यामध्ये सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या आठ नगपरिषदा आहेत. तर मलकापूर, कोरेगाव, लोणंद, पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या आठ नगरपंचायती झाल्या आहेत. नगरपंचायतींना महाराष्ट्र रिजिनल अँड टाऊन प्लानिंग कायदा १९६६ लागू होतो. तसेच नगरपंचायतींच्या गावांचा झपाट्याने विकास होतो. जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या घोषणेनंतर येथे चौफेर विकास झाला. रस्ते, पाणी योजना, दलित वस्ती विकास या पायाभूत सुविधांसह इतर सुविधा नागरिकांना पुरविणे सोपे जाते. राज्यासह केंद्र शासनाचाही निधी नगरपंचायतीला मिळत असल्याने निधीअभावी रखडलेला विकास होत असतो, हे वास्तव आहे. विकासाच्या बाबतीत विचार केल्यास सत्ताधाऱ्यांचे हे प्रशासकीय धोरण वाखाणण्याजोगे ठरले आहे. मात्र या धोरणामागे त्यांचा राजकीय डाव दडलेला नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीने आपला सातारा बालेकिल्ला शाबूत ठेवला. भाजपला या निवडणुकीत सपशेल अपयश आले. मात्र, शहरी भागातील मतदारांची साथ भाजपला मिळाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी सरकारने केलेली घोषणा काँगे्रस-राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी ठरली असून, या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.नगरपंचायतीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांची निवडणुकीपूर्वी मोडतोड करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा परिणाम प्रकर्षाने जाणवणार असून, या परिस्थितीचा भाजप लाभ उठविण्याची शक्यता आहे. शहरी मताधिक्क्यावर कब्जा! साताऱ्याचाच विचार केला तर सातारा-जावळीतील बहुतांश सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या दीपक पवार यांना विधानसभा निवडणुकीत सातारा शहरातून ३ हजार २०० चे मताधिक्य मिळाले होते. शहरी भागातून भाजपला आपसूक चांगली साथ मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील पाच प्रमुख गावांना नगरपंचायतीचा दर्जा देऊन शहरी मताधिक्यावर कब्जा मिळविण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.