शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कोयनेत ७४ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: August 3, 2014 01:52 IST

वीरमधून विसर्ग थांबविला : पावसाचा जोर मंदावला

सातारा/ कोयनानगर / पाटण : गेले काही दिवस सुरू असलेली संततधार शनिवारी थोडी थांबली. काही भागांत पावसाचा जोर थांबला असल्यामुळे धरणातील येवा कमी झाला असून, परिणामी पाणीसाठाही कमी वेगाने वाढत आहे. कोयना धरणातील येवा ४० हजार ६२ क्युसेक इतका असून, शनिवारी सकाळी पाच वाजता ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. वीर धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. अन्य धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत जोरदार सरी कोसळत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार संततधार होत असल्यामुळे पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. मात्र, शनिवारी पावसाचा जोर अचानकपणे मंदावला आहे. उरमोडी, तारळी, वीर धरण लाभक्षेत्रांत जोरदर सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत होता. धरणाच्या दरवाजातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे उरमोडी आणि तारळी नदी पात्राच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरणाची पाणीसाठवण क्षमता १३.५० टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ९.४७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. कण्हेर धरणात ९.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरण भरण्यास अजून एक टीएमसी पाणी हवे आहे. उरमोडी धरणातून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, धरणात ८.७५ टीएमसी इतके पाणी आहे. धरणाची एकूण क्षमता ९.८० टीएमसी इतकी आहे. धोम-बलकवडी धरणाची क्षमता ४.०८ टीएमसी असून, धरणात ३.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात ४.८९ टीएमसी पाणीसाठा असून, क्षमता ५.८५ टीएमसी आहे. धरणातून २९४६ क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही २६.२५ टीएमसी इतके पाणी हवे आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी धरणातील येवा चांगला आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढत चालला आहे. पावसाचा जोर वाढला तरी बहुधा याच महिन्यात धरण भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सांयकाळी पाच या वेळेत कोयना ११ (३२१९), नवजा ६१ (३८५१) तर महाबळेश्वर येथे १२ (३०१८) मिमी पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शनिवारी पहाटे आणि शुक्रवारी दिवसभरात १३३.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक ६८.८ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७५८१.३ मिमी पावसाची नोंद झाली असूून, तालुकानिहाय सरासरी ६८९.२ मिमी इतकी आहे. प्रतिनिधी)