शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

कोरेगाव तालुक्यात ७१ महिला सरपंच

By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST

महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण : खुल्या प्रवर्गासाठी ४६ तर मागास प्रवर्गासाठी १९ ग्रामपंचायती

कोरेगाव : तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी ४६ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ४६, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी १९ आणि महिलांसाठी १९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित राहिले आहे. अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीतील पुरुषासाठी पाच आणि अनुसूचित जातीतील महिलेसाठी सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तहसीलदार अर्चना तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी नायब तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार दिलीप मोरे, रवींद्र रांजणे, श्रीरंग मदने, दिलारबी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय सभागृहात सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रारंभी तांबे व ढाणे यांनी आरक्षण सोडतीमागील शासनाची भूमिका स्पष्ट केली. सर्वात प्रथम कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतची माहिती देण्यात आली. अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आल्याचे तांबे यांनी जाहीर केले. ग्रामपंचायतनिहाय आरक्षण व गावांची नावे पुढीलप्रमाणे, सर्वसाधारण खुला प्रवर्ग - हिवरे, रणदुल्लाबाद, सर्कलवाडी, विखळे, कण्हेरखेड, त्रिपुटी, वाठार स्टेशन, वेलंग (शिरंबे), एकसळ, अरबवाडी, तांबी, दरे, शेल्टी, वेलंग (कण्हेरखेड), चिलेवाडी, पळशी, अनपटवाडी, नागझरी, बनवडी, रुई, नागेवाडी, भक्तवडी, भाडळे, कोंबडवाडी, बेलेवाडी, वाघोली, तळिये, पेठ किन्हई, गुजरवाडी (पळशी), मोरबेंद, जळगाव, आसरे, किरोली, बर्गेवाडी, भीमनगर, सिद्धार्थनगर, जरेवाडी, परतवडी, सोनके, भोसे, चिमणगाव, खेड, जायगाव, भावेनगर, भाकरवाडी, भाटमवाडी या गावांचा समावेश आहे.सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला- रेवडी, सातारारोड, दुर्गळवाडी, साठेवाडी, साप, चोरगेवाडी, मदनापूरवाडी, न्हाळेवाडी, पवारवाडी, अनबलवाडी, अपशिंगे, कठापूर, बोधेवाडी (भाडळे), भंडारमाची, तडवळे संमत वाघोली, आसगाव, चांदवडी, अंबवडे संमत कोरेगाव, न्हावी बुद्रुक, मंगळापूर, तांदूळवाडी, बोरजाईवाडी, घाडगेवाडी, टकले, बोधेवाडी (चिमणगाव), नलवडेवाडी (बिचुकले), तडवळे संमत कोरेगाव, वडाचीवाडी, वेळू, नायगाव, रिकिबदारवाडी, बोरगाव, किन्हई, दहिगाव, गुजरवाडी (टकले), गोगावलेवाडी, दुधनवाडी, बिचुकले, होलेवाडी, शेंदूरजणे, पिंपरी, जांब बुद्रुक, देऊर, सायगाव (धामणेर), सोळशी, कवडेवाडी या गावांचा समावेश आहे. या आरक्षण सोडतपद्धतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. (प्रतिनिधी)फडतरवाडी विभागअनुसूचित जमाती पुरुष- चवणेश्वर.अनुसूचित जाती पुरुष- पिंपोडे बुद्रुक, जांब खुर्द, अंबवडे संमत वाघोली, निगडी, नांदवळ.अनुसूचित जाती महिला प्रवर्ग- कोरेगाव, दुघी, सासुर्वे, ल्हासुर्णे, सायगाव (एकंबे), खिरखिंडी. या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.मागासप्रवर्ग पुरूषनागरिकांसाठी मागासप्रवर्ग पुरुष-चंचळी, पिंपोडे खुर्द, बोबडेवाडी, काळोशी, तारगाव, करंजखोप, आसनगाव, गोडसेवाडी, जाधववाडी, खामकरवाडी, एकंबे, अंभेरी, धुमाळवाडी, भिवडी, न्हावी खुर्द, राऊतवाडी, शिरंबे, सांगवी, कोलवडी.नागरिकांसाठी मागासप्रवर्ग महिला राखीव- कुमठे, शिरढोण, नलवडेवाडी (तारगाव), आर्वी, मोहितेवाडी, खडखडवाडी, मुगाव, धामणेर, वाघजाईवाडी, सुलतानवाडी, रामोशीवाडी, सुर्ली, हासेवाडी, वाठार (किरोली), घिगेवाडी, जगतापनगर, चौधरवाडी, गोळेवाडी, फडतरवाडी या गावांचा समावेश आहे.