शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

६२ हजारांनी घेतला ६७ कोटींचा लाभ

By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST

विविध शिष्यवृत्त्या : सहायक समाजकल्याण आयुक्त उमेश घुले यांची माहिती

 सातारा : ‘राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क सवलत, निर्वाह भत्ता, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार यासाठी २०१३-१४ या वर्षात ६७ कोटी ९३ लाख ७७ हजार खर्च केले असून, याचे लाभार्थी ६२ हजार ११८ इतके आहे,’ अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त उमेश घुले यांनी दिली. विशेष जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील केंद्र शासन शिष्यवृत्ती विभागामार्फत सातारा जिल्ह्यात केंद्र शासन मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ४३ हजार ५ लाभार्थ्यांना देण्यात आला. यावर ५२ कोटी ४५ लाख ४६ हजार खर्च झाले आहेत. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क सवलतीचा ५ हजार २७ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, या अंतर्गत १२ कोटी ८५ लाख ४० हजार खर्च झाले आहेत. केंद्र शासन मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क सवलतीचा लाभ अनुसूचित जाती, विजाभज, इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. सैनिक शाळा निर्वाह भत्त्याचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गातील एकूण ८० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यावर ४२ लाख ९२ हजार खर्च झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या ३७५ लाभार्थ्यांना २० लाख ४६ हजार तर विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गातील ५०६ लाभार्थ्यांना २९ लाख ४६ हजार रकमेचा लाभ देण्यात आला आहे. पुस्तक पेढी योजनेचा अनुसूचित जातीच्या ८९९ लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी ७ लाख ४९ हजार खर्च झाले आहेत. केंद्र शासन शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, सैनिक शाळा निर्वाहभत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या योजनांचे संगणकीकरण झाले असून, लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर रक्क्म जमा करून लाभ देण्यात येत असल्याची माहितीही घुले यांनी दिली. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी घेतला सर्वाधिक लाभ राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेत अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गातील १५१ लाभार्थ्यांना ७ लाख ८५ हजारांचे पुरस्कार देण्यात आले. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा १७७१ लाभार्थ्यांना ५३ लाख २२ हजार खर्चून लाभ देण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजनेअंतर्गत विजाभज प्रवर्गातील २१७ लाभार्थ्यांना ६४ हजारांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीत शिकणार्‍या विजाभज प्रवर्गातील १० हजार ८७ विद्यार्थिंनीना १ कोटी ८७ हजार रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. विशेष जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील केंद्र शासन शिष्यवृत्ती विभागामार्फत सातारा जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे. २०१३-१४ मध्ये जवळपास आम्ही ६७.९३ कोेटी रुपये रक्कम लाभार्थ्यांना दिली आहे. - उमेश घुले, सहायक आयुक्त, समाज कल्याण