शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

६0 हौदांचा शोध सुरू

By admin | Updated: July 10, 2014 00:28 IST

गणेशमूर्ती विसर्जन : सातारा पालिकेतर्फे मोहिमेस प्रारंभ

सातारा : शहरात ६0 ऐतिहासिक हौद असल्याची नोंद पालिकादफ्तरी आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातर्फे या ६0 हौदांचा शोध घेतला जाणार आहे. यापैकी बहुतांश हौद आजही पाहायला मिळतात. मात्र, काही हौदांचे अस्तित्व संपले असण्याची शक्यता आहे.पारंपरिकरीत्या शहरातील तळ्यांत गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मूर्ती तयार करताना घातक रसायनांचा तसेच रंगांचा वापर केला जाऊ लागल्याने तळ्यांतील पाणी दूषित होऊन तळ्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आवाज उठविला. येथील मंगळवार तळे परिसरातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या. या चळवळीत अनेकांनी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणप्रेमींनी तर या चळवळीचे उत्साहाने स्वागत केले. अनेक जण या चळवळीत हिरीरीने सहभागी झाले. शाडूच्या मूर्ती बसविण्याचा आग्रह पालिकेतर्फेही धरण्यात आला आहे. शहर हद्दीत प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांनी दिला आहे. ‘लोकमत’ने तळ्यातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी पालिकेला पर्यायही सुचविले. त्यानुसार पालिकेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. शहरातील ऐतिहासिक हौदांची स्वच्छता करून त्यात गणेशमूर्ती विसर्जनाचा पर्याय ‘लोकमत’ने सुचविला. त्यानुसार पालिका प्रशासनाने शहरातील हौदांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरात असे ६0 हौद अस्तित्वात असल्याची आकडेवारी पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागातून मिळाली. यापैकी अनेक हौद आजही अस्तित्व टिकवून आहेत. (लोकमत टीम)