शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘म्युकरमायकोसिस’चे साताऱ्यात ६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांना आधी कोविडने सतावले. आता कोविडपश्चात आजाराने तारांबळ उडवली आहे. ''म्युकरमायकोसिस''चे सहा रुग्ण साताऱ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारकरांना आधी कोविडने सतावले. आता कोविडपश्चात आजाराने तारांबळ उडवली आहे. ''म्युकरमायकोसिस''चे सहा रुग्ण साताऱ्यात आढळले. पैकी तिघांवर पुण्यात, तर तिघांवर साताऱ्यात उपचार सुरु आहेत. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.

साधारण फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोळ्यांना सुज, नाकाला सुज, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. आजार वाढल्यास मेंदूपर्यंत जाऊन रुग्णाच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

येथील प्रतिभा हाॅस्पिटल या खासगी रुग्णालयात सुनील गोगावले, सचिन साळुंखे, शिवाजीराव जाधव यांच्यावर उपचार सुरु आहेत. तेथील डाॅ. उदयराज फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आजाराबाबत सांगितले की, ‘‘बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ''म्युकर मायकोसिस'' म्हणतात. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. डोळे आणि नाकाला इन्फेक्शन होते. प्रसंगी काही जणांना आपला डोळादेखील गमवावा लागला आहे. या आजाराचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.’’

बुरशीच्या संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहाते. ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तिला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.

‘‘कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो,’’ असं ते म्हणतात. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे या संसर्गाचं प्रमुख कारण आहे.

चौकट

या आजाराची चार प्रमुख लक्षणे

· नाकातून रक्त येणे

· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी

· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट डबो दिसू लागते

______________________