शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५७ विनाअनुदानित शाळा बंद!

By admin | Updated: October 7, 2016 00:15 IST

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : औरंगाबाद येथे शिक्षकांवरील हल्ल्याचा निषेध

सातारा : औरंगाबाद येथील मंगळवारी आयोजित मंत्रिमंडळ बैठकीवेळी मोर्चा दरम्यान पोलिसांनी लाठीहल्ला केला, असा आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ विनाअनुदानित शाळा मुख्याध्यापक संघाने गुरुवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५७ शाळा सहभागी झाल्या.औरंगाबादमध्ये मंगळवारी शिक्षकांनी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. यात २१ शिक्षक व १३ पोलिस जखमी झाले. पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला, असा आरोप करत विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी गुरुवारी राज्यातील शाळा बंद करण्याची हाक दिली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५७ शाळा सहभागी झाल्या. विनाअनुदानित शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुळाल यांची भेट घेऊन बंदमध्ये ५७ शाळा सहभागी झाल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी) विनाअनुदानित शिक्षकांची परवड : देवीसातारा : ‘औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याने विनाअनुदानित शिक्षण व्यवस्थेची राज्यभर चाललेली परवड पुन्हा उजेडात आली आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नावाखाली गल्लाभरू शिक्षण संस्थांची संस्थाने निर्माण झाल्याने शिक्षण व्यवस्थेची राज्यभर हेळसांड सुरू आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षक संघटना (सुटा)चे जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय देवी यांनी व्यक्त केले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देवी यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद घटनेमुळे तंत्रनिकेतने अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत सेवकांच्या हालअपेष्टांना कोणीही वाली नसल्याचे स्पष्टपणे नजरेस येत आहे. सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील फी, आर्थिक मागासलेपणाचे हास्यास्पद निकष व आरक्षणाच्या मर्यादेत न बसणारी गुणवान; पण वंचित पिढीने या महागड्या शिक्षण व्यवस्थेकडे पाठ फिरविली आहेच. मागेल त्याला महाविद्यालये देण्याच्या विधी निषेध शून्य धोरणाने तसेच मागणी व पुरवठा यांचा कोणताही ताळमेळ न लावता पुस्तकी गणितावर अव्यवहारी अर्थशास्त्र मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी या क्षेत्रात धुमाकूळ माजवला आहे. एकीकडे खर्चावर आधारित फी ठरविण्याच्या उदात्त धोरणाला प्रचंड गळती लागल्याने ‘दिले घेतले’ प्रवृत्ती फोफावली अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. नवे, जुने शिक्षणसम्राट तयार झाले. त्यागाच्या नावाखाली खंडणीखोरी सुरू झाली आणि शिक्षणाचा गाभाच हरविला आहे.’ धंदेवाईक नफेखोर ओरबाडूप्रवृत्ती व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेकडे वळल्या आणि व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेची संपन्नाव्यवस्था विपदा झाली. हातात एक व कागदावर एक ही वेतनाची अभिनवपद्धती रुळावली तरीही चार-सहा महिन्यांपर्यंत वेतन रखडलेलेच आहे. प्रचंड फी देऊन शिकूनही वा देणगी देऊन नोकरी टिकविण्याची शाश्वती नसल्याने आता व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेची वाटचाल शैक्षणिक अराजकतेकडे सुरू आहे. समाजापुढे ‘कमवा शिका’ योजनेद्वारे आदर्श निर्माण करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने या व्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणासाठी सर्वसमावेशक नेतृत्व करण्याची व ‘केजी टू पीजी’ मोफत शिक्षणव्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असेही देवी यांनी पुढे म्हटले आहे. (प्रतिनिधी)