शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

५०० रुपयांची लाच घेताना पकडले

By admin | Updated: April 1, 2016 01:01 IST

परभणी : खंडीत केलेला वीजपुरवठा वीज बिल भरणा केल्यानंतर जोडून देण्यासाठी वीज वितरणच्या कार्यालयातील एका खाजगी इसमाने तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केली़

परभणी : खंडीत केलेला वीजपुरवठा वीज बिल भरणा केल्यानंतर जोडून देण्यासाठी वीज वितरणच्या कार्यालयातील एका खाजगी इसमाने तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केली़ यात खाजगी इसमास ३१ मार्च रोजी रंगेहात पकडण्यात आले़ घराच्या मिटरचा खंडीत केलेला वीजपुरवठा तक्रारदाराने वीज बिल भरणा करून जोडण्याची मागणी महावितरणच्या फ्युजकॉल सेंटर ४ कडे केली होती़ हा खंडीत वीजपुरवठा जोडण्यासाठी येथील एका कर्मचाऱ्याने ७०० रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितल्याची तक्रार एसीबी कार्यालयात देण्यात आली होती़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून महावितरण कंपनी कार्यालयात तक्रादाराकडून लाच घेणाऱ्या शेख अझरोद्दीन शेख रहीमोद्दीन काजी या खाजगी व्यक्तीस ५०० रुपयांची लाच घेताना ३१ मार्च रोजी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ ही कारवाई पोलिस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, कर्मचारी लक्ष्मण मुरकुटे, राजू ननवरे, अविनाश पवार, श्रीकांत कदम, सारिका टेहरे, रमेश टाक यांनी केली़ (प्रतिनिधी)