कऱ्हाड : सातारा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनअंतर्गत कऱ्हाड तालुका अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन, कऱ्हाड यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत ५00 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. वुहॉन (चीन) येथे झालेल्या जागतिक शालेय अॅथलेटिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल चैत्राली गुजर हिचा सत्कार केला.प्रशिक्षक कालिदास गुजर यांचे राज्य अॅथलेटिक संघटनेचे सहसचिव संजय वाटेगावकर, दिलीप चिंचकर, मनोहर यादव, सचिन काळे, सोमनाथ शिंदे, निरंजन साळुंखे, वीरभद्र कावडे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देण्यात आले. संजय वाटेगावकर यांनी प्रास्ताविक केले. तर महेंद्र भोसले यांनी आभार मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, तसेच संजय राठोड, दत्तात्रय पाटील, अमित माने, योगेश खराडे, जे. व्ही. पाटील, सारंग थोरात, पांडुरंग येडगे, उमेश नलवडे इत्यादींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ५00 खेळाडूंचा सहभाग
By admin | Updated: July 14, 2015 21:42 IST