पाटण : कोयना धरणात गेल्यावर्षी जूनप्रारंभी ३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा केवळ १२.१८ टीएमसी पाणीसाठा असताना त्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तो ५१.०६ टीएमसी होता. कोयना धरणातील पाणीसाठ्याचे अर्धशतक पूर्ण झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. ९ ते १२ जुलै या कालावधीत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे कोयना धरणातील पाण्याची चिंता दूर झाली. आतापर्यंत कोयना येथे २,०५७, नवजा येथे २,६१६, तर महाबळेश्वरमध्ये २,०८९ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या २४ तासांत केवळ ०.८० टीएमसीची भर पडली. कोयना येथे २०, नवजा येथे २१, तर महाबळेश्वरमध्ये १० मिलिमीटर पाऊस पडला. (प्रतिनिधी)
कोयना धरणामध्ये ५० टीएमसी पाणीसाठा
By admin | Updated: July 18, 2016 00:30 IST