शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वीजबिलातून कायमची सुटका; साताऱ्यातील पाच हजार घरांमध्ये घडलीय ‘सौर’क्रांती!, महिन्याला किती लाख युनिट होते वीज निर्मिती.. वाचा

By सचिन काकडे | Updated: September 12, 2025 18:49 IST

सूर्यघर योजनेची किमया : महिन्याला ११ लाख ५० हजार युनिट वीज निर्मिती

सचिन काकडे

सातारा : विजेच्या वाढत्या बिलांनी मेटाकुटीला आलेल्या साताऱ्यातील ५ हजार २६ कुटुंबांच्या घरात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेने ‘सूर्य’क्रांती घडवून आणली आहे. या योजनेमुळे घराच्या छतावर ‘सोलर रूफटॉप’ यंत्रणा बसवून हे नागरिक स्वत:च स्वतःची वीज तयार करत आहेत, ज्यामुळे त्यांचे मासिक वीजबिल कायमचे शून्य झाले आहे. या कुटुंबांची एकूण स्थापित वीज क्षमता १६.५ मेगावॅट इतकी आहे.

वीजबिलातून कायमची सुटकाज्या घरांमध्ये महिन्याला हजारो रुपये वीजबिल येत होते, त्याच घरांमध्ये आता महिन्याला सरासरी ११ लाख ५० हजार युनिट सौर वीज तयार होत आहे. या ग्राहकांनी त्यांच्या वीज वापराची चिंता कायमची मिटवली आहे. स्वतःची वीज वापरून उरलेली वीज ते महावितरणला विकता येते व गरज भासेल तेव्हा महावितरणकडून मोफत घेताही येते.

नेमकी काय आहे ही योजना?सूर्यघर मोफत वीज योजना हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्या अंतर्गत देशातील घरगुती ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप पॅनेल बसवण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. तसेच प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदानही दिले जाते. ही योजना प्रामुख्याने सर्वसामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. ज्याला विजेच्या बिलातून कायमची सुटका हवी आहे, तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत कोणत्याही वर्गासाठी किंवा आर्थिक गटासाठी कोणतीही मर्यादा नाही. शहरी किंवा ग्रामीण भागातील कोणताही ग्राहक या योजनेसाठी पात्र आहे.

सौर प्रकल्प बसविलेले ग्राहक तालुकानिहाय

  • सातारा : २०००
  • कराड : १४८२
  • फलटण : ७७७
  • वडूज : ४१४
  • वाई : ३५१

क्षमतेनुसार असे मिळते अनुदानकिलोवॅट - रक्कम

  • १ - ३० हजार
  • २ - ६० हजार
  • ३ - ७८ हजार

असे होताहेत फायदेवीजबिलातून कायमची मुक्ती : एकदा ही यंत्रणा बसवल्यानंतर, वीज निर्मिती सुरू होते. वीजबिल शून्यावर येते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला सरासरी १०२ युनीट वीज तयार होते.विजेच्या बदल्यात वीज : गरजेपेक्षा जास्त वीज तयार झालेली वीज नेट मीटररिंगद्वारे महावितरणला विकता येते. तसेच गरजेनुसार महावितरण कडून मोफत वीज घेता येते.पर्यावरणाची काळजी : अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून वीज निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि प्रदूषण कमी होते.

असे होते वीजबिल शून्यजर का एखाद्या ग्राहकाचा वीजवापर मासिक २०० यूनिट आहे. घरगुती दराप्रमाणे त्या ग्राहकाला स्थिर आकार, वीज आकार, वहन शुल्क असे सर्व प्रकारचे कर मिळून प्रति युनीट ११ रुपये १० पैसे प्रमाणे मासिक २ हजार २०० रुपये बिल येत असेल तर त्या ग्राहकाची वार्षिक २६ हजार ६४० रुपयांची बचत होते.