शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील विकासकामांना पाच कोटी

By admin | Updated: September 1, 2014 00:04 IST

मकरंद पाटील : घाट विकासाला एक कोटीची तरतूद

वाई : वाई शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून पाच कोटी खर्चाच्या विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नगरपालिकांच्या प्राथमिक सोयी-सुविधा व विकासकामांच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. महागणपती मंदिरालगत नदीपात्राचे दक्षिण बाजूच्या घाट विकासासाठी क्रॉँक्रीट करण्यासाठी १ कोटी १० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी गणेशोत्सवामध्ये वाईच्या महागणपतीला निधी अभिषेक केल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू झाली आहे. शिवाजी उद्यान येथील जलतरण तलावाच्या वाढीव कामासाठी १ कोटी, रविवार पेठ केसरकर पाणवठा व मांगरवळी येथे अत्याधुनिक शौचालय बांधकामासाठी अनुक्रमे २५ लाख २६ हजार व २६ लाख ५५ हजार, रविवार पेठ चव्हाण पेठेकर कॉलनी येथील सांडपाणी व्यवस्था बंदिस्त गटार ३९ लाख, गंगापुरी येथे व्यायामशाळा बांधकामासाठी २८ लाख, किसन वीर चौक ते यंग रविवार चौकामार्गे जुम्मा मस्दिज, प्यासा कोल्ड्रिंक्स ते ग्रामीण रुग्णालय, किसन वीर चौक ते घोडवडेकर हॉस्पिटल, रविवार पेठ केसरकर पाणवठा जवळील साकल पुलाचे अ‍ॅप्रोच रस्ते व इतर तीन रस्ते डांबरीकरणासाठी १ कोटी ५० लाख, सोनगिरवाडी येथील चार व फुलेनगर येथील दोन गटार बांधकामासाठी ५९ लाख ७० हजार खर्चाची कामे मंजूर झाली आहे. यापूर्वी नगरपरिषद प्रशासकीय इमारत अंतर्गत सजावट कामासाठी ३ कोटी व आठ ठिकाणच्या रस्त्यासाठी एक कोटी रक्कम मंजूर होऊन ही कामे प्रगतिपथावर आहे, अशी माहिती नगराध्यक्ष भूषण गायकवाड, आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, डॉ. अमर जमदाडे, उपाध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष नीलिमा खरात, मुख्याधिकारी आशा राऊत, नगरसेवक बुवा राऊत, अनिल सावंत, सुभाष रोकडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)