शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ४६७ अतितीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:56 IST

प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी पाच कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या ...

प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी पाच कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या अहवालानुसार यावर्षी अती तीव्र बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले.एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आला. मध्यम तीव्र कुपोषित (मॅम), अतितीव्र कुपोषित (सॅम) अशा दोन प्रकारांत कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. यापूर्वी कुपोषित बालकांना लोकसहभागातून पोषण आहार मिळत असे. यावर्षीपासून शासनाने अनुदान लागू केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील स्थानिक पातळीवरील ग्राम बाल विकास केंद्रामार्फत ही योजना राबविली जाते. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचा अंगणवाडी, वाड्या-वस्त्यांमधून शोध घेतला जातो. त्यानंतर बालकांची वयोगट अन् वजन आदींबाबत तपासणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या बालकांचा मॅम आणि सॅम या वर्गावारीत समावेश केला जातो.जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अती तीव्र कुपोषित बालकांची संख्या सातारा तालुक्यात ७२, जावळी ६, कोरेगाव ४४, खंडाळा ३४, फलटण ५१, खटाव ३७, कºहाड ६९, पाटण ४५, महाबळेश्वर ६, माण २५ तर वाई तालुक्यात ४४ इतकी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनांतर्गत डिसेंबर २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ११८७ तर अतितीव्र कुपोषितांची संख्या १८६ इतकी होती. मार्च २०१६-१७ च्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८८७ तर तीव्र कुपोषितांची संख्या १२८ इतकी नोंदविली गेली होती. लोकसहभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामविकास केंद्राचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुुलनेत कºहाड तालुक्याची स्थिती चांगली आहे.राज्य शासनाने या वर्षीपासून पोषण अभियान राबविला असून, यामध्ये राज्यातील ३७ जिल्ह्यांमधून केवळ सहा जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा सहभाग आहे. प्रथम टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांना पोषण अभियान लागू केला आहे. पुढील वर्षापासून सातारा जिल्ह्याचाही पोषण अभियानात समावेश होणार आहे.पोषण महिना अंतर्गत कृती आराखडापोषण महिना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे वाटप करणे, प्रभात फेरी काढणे, पोषण आहारावर चित्रफीत दाखविणे, बालकांचे वजन व छाननी करणे, शाळामध्ये योग्य आहाराचे सेवन, महिलांसाठी योगा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, बचत गटांची एकत्रित चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत जनजागृतीसाठी गृहभेटीसह विविध कार्यक्रम, आरोग्य व पोषण विषयाचे प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोषाखासह फॅन्सी ड्रेस, शालेय निबंध स्पर्धा अशा अनेक योजनांचा प्रचार व प्रसिद्धी सध्या सुरू आहे.अद्याप सुधारणा न झालेली ९१ बालकेग्राम बाल विकास योजनेत दाखल झालेल्या ४१५ अती तीव्र कुपोषित २४७ बालकांची सुधारणा झाली असून, सर्वसाधारण श्रेणीमध्ये ८० बालकांचा समावेश झाला आहे. अद्याप सुधारणा न झालेल्या बालकांची संंख्या ९१ इतकी आहे. तर ग्राम बाल विकास योजनेत ४९ बालकांची नोंद पालकांकडून झाली नाही.