शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील नव्या उड्डाण पुलास ४५९ कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

मलकापूर : शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती क्षेत्राच्या सुधारणा व दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या ...

मलकापूर : शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती क्षेत्राच्या सुधारणा व दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ५५८ कोटी २४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी मलकापूर शहरातील तीन किलोमीटर नव्या उड्डाण पुलासाठी ४५९ कोटी ५२ लाखाचा भरघोस निधी मंजूर झाल्यामुळे मलकापूरचे रुपडेच पालटणार आहे.

कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पट्ट्‌यातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल ६४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधील पाचपैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍ह्यातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील नव्‍या उड्डाण पुलासाठी ४५९ कोटी ५२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मसूर फाटा येथील अंडर पास पुलासाठी ४७ कोटी १८ लाख, इंदोली फाटा अंडर पास पुलासाठी ४५ कोटी ३५ लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हिस रस्त्यासाठी ६ कोटी १९ लाख निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी शेंद्रे ते कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे. अपघातांची मालिका वाढल्यापासून सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्यापरीने केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्‍यवहार करून, तसेच अनेकदा त्यांना प्रत्‍यक्ष भेटून, सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. शेंद्रे ते कागल अशा १३२ कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वाहतुकीसाठी निर्माण होत असलेली धोकादायक परिस्थिती, तसेच या पट्ट्‌यात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याकडे त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सर्वांच्या मागणीचा विचार करून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडकरी यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.

मागणी व पाठपुरावा सर्वांनीच केला. कसा का असेना, मलकापूर शहरातील तीन किलोमीटर लांबीचा पिलरवरील या पट्ट्‌यातील सर्वात मोठा उड्डाण पूल लवकरच तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा पूल तयार झाल्यास मलकापूर शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.

चौकट

मलकापूरला नवी मुंबईचा लूक

महामार्गाच्या सहापदरीकरणात मलकापुरात ११२ कॉलमवरील आधारित सहापदरी उड्डाण पूल. उड्डाण पुलाखाली दोन्ही बाजूला चार चार पदरी उपमार्ग बनवण्यात येणार आहेत. या मास्टर प्लॅनप्रमाणे रस्ते तयार झाल्यानंतर मलकापूरला नवी मुंबईचा लूक प्राप्त होणार आहे.