शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार विद्यार्थ्यांच्या ‘आयुष्याची परीक्षा’

By admin | Updated: March 2, 2016 00:56 IST

‘दहावी’साठी जिल्ह्यात ११२ केंद्रे : महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेत पालकांचीही लागणार कसोटी

सातारा : आजपासून सर्वत्र दहावीची परीक्षा सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेनं विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांची धडधड वाढविली आहे. जिल्ह््यातील ४५ हजार ५०३ विद्यार्थी आपल्या आयुष्याला देणारी ही परीक्षा देत आहेत. हुरहूर, धडधड अन् उत्साह असे संमिश्र भाव मंगळवारी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होते. मंगळवारी मराठी भाषेचा पेपर झाला.यंदाच्या दहावीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे ही परीक्षा तब्बल महिनाभर चालणार आहे. त्यामुळे २९ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासाशी गाठ बांधावी लागणार आहे. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार असला तरी त्यांना दडपणाखाली वावरावे लागणार असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. तब्बल एक महिना चालणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचीही ‘परीक्षा’ पाहणारी ठरणार आहे. मंगळवारी सकाळी सातारा शहरातील पंधरा परीक्षा केंद्रांवर आपला बैठक क्रमांक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज पहिला पेपर असल्याने विद्यार्थी थोडे भांबाहून गेलेले दिसत होते. जो-तो एकमेकांना तुझा नंबर कुठे आला आहे? अभ्यास झाला आहे का? मला फारच टेन्शन आलं आहे, अशी चर्चा करताना दिसत होते. बहुतांशी मुलांबरोबर त्यांचे पालकही आले होते. परीक्षा केंद्राबाहेर लावलेल्या फलकांवर आपल्या मुलाचा नंबर कोणत्या वर्गात आला आहे, याची शोधाशोध करत होते. तर काही पालक परीक्षेला सामोरे जाण्याऱ्या आपल्या मुलांना मानसिक आधार देताना दिसत होते. २९ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेसाठी सातारा १५, कऱ्हाड २३, पाटण १०, कोरेगाव १०, खटाव १४, खंडाळा ४, जावळी ६, फलटण १०, वाई ८, महाबळेश्वर ३, माण ९ अशा ११२ केंद्रांवर मंगळवारी दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली. (प्रतिनिधी)गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकेजिल्ह्यात ११२ केंद्रांवर सुमारे ४५ हजार ५०३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात आहे. जिल्ह्यात सातारा तालुक्यातील परळी, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली व वाघाली ही तीन केंद्रे तर फलटण या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी विशेष नजर ठेवली जात आहे.वर्ये, ता. सातारा येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाला कॉपी करणारा एक परीक्षार्थी सापडला. त्याचा अहवाल कोल्हापूर बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर ११२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू आहे. सहा भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुल्लाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.